जाणून घ्या, भाषणावेळी कसं काम करतं PM मोदींचं Teleprompter? किती असते किंमत?

By ऑनलाइन लोकमत | Published: January 18, 2022 02:11 PM2022-01-18T14:11:28+5:302022-01-18T14:31:04+5:30

पंतप्रधान नरेंद्र मोदी सोमवारी वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमच्या दावोस अजेंडा समिटमध्ये सहभागी झाले होते. यावेळी त्यांना भाषण थांबवावे लागले. यासंदर्भात एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओ क्लिपसंदर्भात, दावा केला जात आहे की, पंतप्रधानांना टेलिप्रॉम्प्टरमध्ये आलेल्या अडचणीमुळे आपले भाषण थांबवावे लागले. यावर राहुल गांधींनीही भाष्य केले आहे...

पंतप्रधान नरेंद्र मोदी सोमवारी वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमच्या दावोस अजेंडा समिटमध्ये सहभागी झाले होते. ही एक व्हर्च्युअल समिट होती, यात काही समस्या आल्याने त्यांना भाषण थांबवावे लागले. या समिटचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर होत आहे. या व्हिडिओ क्लिपसंदर्भात, दावा केला जात आहे की, पंतप्रधानांना टेलिप्रॉम्प्टरमध्ये आलेल्या अडचणीमुळे आपले भाषण थांबवावे लागले.

या अडचणीसंदर्भात अद्याप कसल्याही प्रकारचे अधिकृत वक्तव्य आलेले नाही. मात्र विरोधक टेलीप्रॉम्पटरमध्ये समस्या आल्याचे म्हणत आहेत. तर, हा टेक्निकल ग्लिच World Economic Forum कडूनच आल्याचे भाजपच्या नेत्यांचा दावा आहे. या व्हिडिओवर राहुल गांधींनीही भाष्य केले आहे. एवढा खोटेपना Teleprompter ही सहन करू शकला नाही, असे राहुल गांधींनी म्हटले आहे.

काय आहे टेलीप्रॉम्पटर? - Teleprompter ला Autocue देखील म्हटले जाते. या डिव्हाइसचा वापर टेक्स्ट वाचण्यासाठी आणि कॅमेऱ्यासमोर केला जातो. यामुळे समोर बसलेल्या लोकांना, आपण कशापद्धतीने बोलत आहोत, याची भनकही लागत नाही आणि आपण न थांबता आपले बोलणे पूर्ण करू शकतात.

टेली प्रॉम्प्टर्सचे अनेक प्रकार आज बाजारात उपलब्ध आहेत. मात्र, राजकीय नेते ज्या पद्धतीच्या टेली प्रॉम्प्टरचा वापर करतात, ते पारदर्शक काचेसारखे असते. हे प्रेक्षकांना सामान्य काचेसारखे वाटते, परंतु स्टेजवर असलेल्या व्यक्तीला सर्वकाही स्पष्टपणे दिसते.

या टेलिप्रॉम्प्टरचे नियंत्रण स्क्रीन पाहणाऱ्या व्यक्तीकडे असते, यामुळे मजकुराचा वेग सहजपणे वाढवता अथवा कमी करता येतो. मात्र, पंतप्रधान आणि इतर नेते वापरतात ते टेलीप्रॉम्पटर थोडे वेगळ्या प्रकारचे असते.

आपण कधी पंतप्रधानांचे लाल किल्ल्यावरील भाषण एकले आहे? जर तुम्ही लक्षपूर्वक पाहिले असेल, तर पंतप्रधानांच्या आजूबाजूला एक ग्लास पॅनल दिसते. अनेक जण याला बुलेट प्रूफ ग्लासही समजतात, पण प्रत्यक्षात ते एक टेलिप्रॉम्प्टर असते.

कसे काम करते पंतप्रधानांचे टेलीप्रॉम्पटर? - अशा प्रकारच्या टेलीप्रॉम्पटरला Conference Teleprompter देखील म्हटले जाते. यात LCD मॉनिटर खालच्या बाजुला असते. ज्याचा फोकस वरच्या बाजुला असतो. वक्त्याच्या आस-पास ग्लास लगलेले असतात. ते अशा प्रकारे अलाय केलेले असतात, की LCD मॉनिटरवरील टेस्क्ट त्यांवर रिफ्लेक्ट होतात. अशा प्रकारे पंतप्रधान मोदी आपले भाषण कुठल्याही अडथळ्याशिवाय टेलीप्रॉम्पटरच्या सहाय्याने पूर्ण करतात.

यावेळी भाषणाचा वेग ऑपरेटरकडून कंट्रोल केला जातो. तो वक्त्याचे भाषण अत्यंत काळजीपूर्वक ऐकतो आणि त्यांचे भाषण फॉलो करतो. जेव्हा वक्त थांबतो, तेव्हा ऑपरेटर मजकूर थांबवतो. मात्र, प्रेक्षकांना हा टेस्क्ट दिसत नाही. त्यांना केवळ ग्लास आणि त्यामागे उभा असलेला वक्ताच दिसतो.

किती असते किंमत? अशा प्रकारच्या टेलिप्रॉम्प्टरची किंमत खूप अधिक आहे. भारतात, हे 2,78,755 ते 17,12,485 रुपयांपर्यंतही खरेदी करू शकता. याची किंमत साइज आणि पेयरवर अवलंबून असते.

टेली प्रॉम्प्टरची किंमत लाखो रुपयांत आहे. कारण ते हाय-टेक तंत्रज्ञानावर काम करतात. ते मिटिंग्स सभा आणि रॅलींमध्ये वापरले जाते. देश-परदेशात यांना मोठी मागणी आहे. टेली प्रॉम्प्टर कमी बजेट मध्येही मिळते. पण ते तेवढे हायटेक नसतात. तसेच, वापरण्यातही अडथळा येतो. पत्रकारितेच्या संस्थांमध्येही अँकर्स याचा वापर करून बातम्या वाचतात आणि तुम्हाला कळतही नाही.