शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Karnataka Opinion Polls: कर्नाटकमध्ये कोण जिंकणार? भाजपा काँग्रेस की त्रिशंकू विधानसभा, सर्व ओपिनियन पोल्सची आकडेवारी एकाच ठिकाणी

By ऑनलाइन लोकमत | Published: March 29, 2023 8:04 PM

1 / 6
कर्नाटकमध्ये विधानसभा निवडणुकीच्या कार्यक्रमाची घोषणा केंद्रीय निवडणूक आयोगाने आज केली आहे. कर्नाटकमध्ये विधानसभेच्या २२४ जागांसाठी १० मे रोजी मतदान होणार आहे, तर १३ मे रोजी निकाल जाहीर होणार आहेत.
2 / 6
दरम्यान, निवडणुकीची घोषणा होताच विविध वृत्तवाहिन्या आणि संस्थांकडून कर्नाटकमधील निवडणुकीच्या संभाव्य निकालाबाबत अंदाज वर्तवणारे ओपिनियन पोल जाहीर होऊ लागले आहेत. आज प्रसिद्ध झालेल्या बहुतांश पोल्सनी कर्नाटकमध्ये काँग्रेसचा विजय होईल, असा अंदाज वर्तवला आहे. तर एका पोलने भाजपा बहुमत मिळवेल, अशी शक्यता वर्तवली आहे.
3 / 6
एबीपी न्यूज-सी वोटरने आपल्या ओपिनियन पोलमध्ये कर्नाटमध्ये काँग्रेसचा विजय होईल, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. काँग्रेसला ११५ ते १२७, भाजपाला ६८ ते ८०, जेडीएसला २३ ते २५ आणि इतरांना ० ते २ जागा मिळतील, असे या ओपिनियन पोलमध्ये म्हटले आहे.
4 / 6
तर Matrize च्या ओपिनियन पोलमध्ये भाजपाला आघाडी दाखवण्यात आली आहे. या पोलनुसार काँग्रेसला ८८ चे ९८, भाजपाला ९६ ते १०६, जेडीएसला २३-३३ आणि इतरांना २ ते ७ जागा मिळतील, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
5 / 6
लोकपोल्सच्या ओपिनियन पोलमध्येही काँग्रसेला बहुमत मिळेल असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. या पोलनुसार काँग्रेसला ११६ ते १२३, भाजपाला ७७ ते ८३, जेडीएसला २१ ते २७ आणि १ ते ४ जागा मिळतील, अशी शक्यता वर्तवली आहे.
6 / 6
तर पॉप्युलर पोल्सने कर्नाटकात त्रिशंकू विधानसभेचा अंदाज वर्तवला आहे. या पोलनुसार काँग्रेसला ८२ ते ८७, भाजपला ८२ ते ८७ आणि जनता दल सेक्युलर पक्षाला ४२ ते ४५ जागा मिळतील.
टॅग्स :Karnatakकर्नाटकBJPभाजपाcongressकाँग्रेसJanata Dal (Secular)जनता दल (सेक्युलर)