Kargil Vijay Diwas : देशभरातून शहीद जवानांना मानवंदना

By ऑनलाइन लोकमत | Published: July 26, 2018 03:54 PM2018-07-26T15:54:16+5:302018-07-26T16:07:35+5:30

आज कारगिल विजय दिन, 19 वर्षांपूर्वी जम्मू काश्मीरमधील कारगिल, द्रास आणि बटालिक या भागाल लढल्या गेलेल्या युद्धातील हुतात्म्यांना देशभरातून श्रद्धांजली वाहण्यात येत आहे.

कारगिल युद्धात वीरमरण पत्करणाऱ्या जवानांच्या द्रास येथील स्मारकाच्या ठिकाणी विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

द्रास येथील युद्ध स्माकराच्या ठिकाणी शहीद जवानांना आदरांजली वाहताना स्थानिक नागरिक.

कारगिल युद्धातील शहीद जवानांचे स्मारक.

संरक्षणमंत्री निर्मला सीतारामन यांनी तिन्ही संरक्षण दलांच्या प्रमुखांसह इंडिया गेट येथील अमर जवान ज्योतीजवळ शहीद जवानांना मानवंदना दिली.

कारगिल येथील युद्धस्मारकाजवळ भारतील लष्कराच्या जवानासह चिमुकला.

प्रख्यात वाळूशिल्पकार सुदर्शन पटनाईक यांनी शहीद जवानांचे वाळूशिल्प बनवून त्यांना आदरांजली वाहिली.