JNUमध्ये पुन्हा वाद ! 75 टक्के हजेरीची सक्ती रद्द करण्याची विद्यार्थ्यांची मागणी
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 16, 2018 15:08 IST2018-02-16T14:23:32+5:302018-02-16T15:08:46+5:30

जवाहरलाल नेहरू विद्यापीठ नवीन वादामुळे पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. आपल्या मागण्या मान्य करुन घेण्यासाठी विद्यापीठाच्या कुलगुरुंना विद्यार्थ्यांनी कोंडून ठेवल्याचा वाद समोर आला आहे.
कुलगुरुंना कोंडून ठेवल्याचा आरोप विद्यार्थ्यांनी फेटाळून लावला आहे.
विद्यापीठानं 75 टक्के सक्तीच्या हजेरीसहीत अनेक नियमांचं परिपत्रक जारी केले आहे. या परिपत्रकात मांडण्यात आलेले नियम विद्यार्थ्यांना मान्य नाहीत.
75 टक्के हजेरीचा नियम रद्द करण्याच्या मागणीसाठी विद्यार्थ्यांचं आंदोलन
कुलगुरुंनी भेटीसाठी वेळ न दिल्याचा विद्यार्थी संघटनेचा आरोप
कुलगुरू अॅडमिन डिपार्टमेंटमध्येच उपस्थित होते, मात्र तरीही ते विद्यार्थ्यांना भेटले नाहीत.