३ सुवर्ण जिंकल्यानंतर ९५ वर्षीय आजीबाईंचं भारतात आगमन; लोकांनी केलं जल्लोषात स्वागत
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 4, 2023 14:04 IST
1 / 9वर्ल्ड मास्टर्स ॲथलेटिक्स इनडोअर चॅम्पियनशिप २०२३ मध्ये भारतासासाठी ३ सुवर्ण पदक जिंकलेल्या ९५ वर्षीय आजीबाईंचं भारतात आगमन झाले आहे. भगवानी देवी यांचे मंगळवारी दिल्ली विमानतळावर जल्लोषात स्वागत करण्यात आले.2 / 9पोलंड येथे झालेल्या नवव्या वर्ल्ड मास्टर्स ॲथलेटिक्स इनडोअर चॅम्पियनशिपमध्ये भारताच्या भगवानी देवी यांनी सहभाग नोंदवला होता. ३ सुवर्ण जिंकल्यानंतर ९५ वर्षीय देवी यांनी मायदेशात पुनरागमन केले.3 / 9सुवर्ण विजेत्या आजीबाईंची एक झलक पाहण्यासाठी दिल्ली विमानतळावर मोठी गर्दी जमली होती. यावेळी त्यांनी लोकांना एक भावनिक संदेश दिला.4 / 9९५ वर्षीय आजीबाईंच्या या सोनेरी यशाचे कौतुक केंद्रीय क्रीडा मंत्री अनुराग ठाकूर यांनी देखील केले. तसेच पदक जिंकण्याचा पूर्ण विश्वास होता असे देवी यांनी यावेळी सांगितले. 5 / 9देवी यांचे दिल्ली विमानतळावर आगमन होताच लोकांनी त्यांना नोटांचा आणि फुलांचा पुष्पहार घातला. भगवानी देवी डागर यांनी पोलंडमध्ये ३ सुवर्ण जिंकून तिरंग्याची शान वाढवली. 6 / 9दरम्यान, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी देखील ट्विट करत भगवानी देवी यांचे अभिनंदन केले. ९५व्या वर्षी ३ सुवर्ण पदक जिंकणे फार निराळी गोष्टी असल्याचे केजरीवाल यांनी म्हटले.7 / 9भगवानी देवी यांनी एक भावनिक संदेश देताना म्हटले, 'आपल्या मुलांना शिकवा, धावायला लावा... जेणेकरून ते देशासाठी पदक जिंकतील.'8 / 9ॲथलेटिक्स इनडोअर चॅम्पियनशिपमध्ये देवी यांनी ६० मीटर धावणे, डिस्कस थ्रो आणि शॉटपुट या स्पर्धांमध्ये सुवर्ण पदक जिंकले. 9 / 9मूळच्या हरयाणा येथील असलेल्या भगवानी देवी यांनी वयाच्या ९५व्या वर्षी पदक जिंकून तरूणाईसमोर एक आदर्श निर्माण केला आहे. यश मिळवण्यासाठी वयाची कोणतीही सीमा नसते याचा प्रत्यय देवी यांनी दाखवून दिला.