शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Indian Railways: दुरंतो, राजधानी, शताब्दी...; जाणून घ्या, भारतीय रेल्वेत कशा प्रकारे निश्चित केली जातात ट्रेनची नावं

By ऑनलाइन लोकमत | Published: May 18, 2022 11:48 AM

1 / 8
भारतीय रेल्वेला देशाची लाईफ लाईन म्हणूनही ओळखले जाते. रेल्वेने दैनंदीन प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्याही मोठी आहे. अनेक वेळा तिकीट बूक करताना आपण गाड्यांची वेगवेगळी नावे पाहत असाल. पण, या ट्रेन्सना कशा पद्धतीने नावे दिली जातात? कशाच्या आधारे नावे दिली जातात? याचा विचार आपण कधी केला आहे? तर याचे उत्तर आहे, या गाड्यांना त्यांच्या वैशिष्ट्यानुसार नावे दिली जातात.
2 / 8
राजधानीचे नाव राजधानी का पडले? सुरुवातीला राजधानीची सुरुवात, राज्यांच्या राजधान्यांना जोडण्यासाठी करण्यात आली होती. राजधानी दिल्लीसह राज्यांच्या राजधान्यांदरम्यान हाय स्पीड ट्रेन चालविण्यासाठी, या ट्रेनची सुरुवात करण्यात आली होती.
3 / 8
राजधानी ही एक सुपर फास्ट ट्रेन आहे, तिची स्पीड वेळोवेळी अपग्रेड करण्यात आली आहे. या ट्रेनचा ताशी वेग 140 किमी एवढा आहे. ही भारतातील सर्वात विशेष गाड्यांपैकी एक आहे. दळवणळणाच्या बाबतीत प्रथम प्राधान्य याच ट्रेनला दिले जाते.
4 / 8
शताब्दी ट्रेन ही देशातील सर्वाधिक उपयोगात येणारी ट्रेन आहे. साधारणपणे 400 ते 800 किमीच्या प्रवासासाठी या ट्रेनला सर्वाधिक पसंती दिली जाते. ही ट्रेन देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या 100 व्या वाढदिवसानिमित्त 1989 साली सुरू करण्यात आल्याने, तिला शताब्दी असे नाव देण्या आले आहे.
5 / 8
शताब्दी ट्रेनच्या वेगाचा विचार करता, ही ट्रेन ताशी 160 km एवढ्या वेगाने धावते. या ट्रेनमध्ये कसल्याही प्रकारचा स्लीपर कोच नसतो. तर केवळ AC चेअर कार आणि Executive चेअर कार असतात.
6 / 8
दुरंतो म्हणजे सर्वात कमी स्टॉपेज असलेली ट्रेन. ही ट्रेन लांब पल्ल्याचा प्रवास करते. या ट्रेनला दुरंतो हे नाव बंगाली शब्द निर्बाद अर्धात restless वरून मिळाले आहे.
7 / 8
दुरांतो ट्रेन ही अनेक बाबतीत राजधानी ट्रेनपेक्षाही वेगवान मानली जाते. तिचा वेग सुमारे 140 किमी एवढा आहे. ही ट्रेन सर्वात जास्त संख्येने धावते. म्हणजेच राजधानी आणि शताब्दीपेक्षाही अधिक.
8 / 8
दुरंतो मध्ये LHB स्लीपर कोच असतात. जे सामान्य ट्रेनच्या तुलनेत उंच असतात. या कोचमुळे ट्रेनला अधिक गती मिळते. ही ट्रेन रोज केवळ विशेष परिस्थितीतच चालविली जाऊ शकते. अन्यथा ही ट्रेन आठवड्यातून केवळ 2 ते 3 दिवसाच्या हिशेबानेच चालविली जाते.
टॅग्स :Indian Railwayभारतीय रेल्वेrailwayरेल्वे