Indian Railways: फक्त 'या' 6 देशात तयार होतात सर्वात शक्‍त‍ीशाली रेल्वे इंजिन, भारताच्या नावे हा रेकॉर्ड..

By ऑनलाइन लोकमत | Published: January 27, 2023 02:25 PM2023-01-27T14:25:45+5:302023-01-27T15:14:48+5:30

Indian Railways: जगातील सर्वात शक्तीशाली रेल्वे इंजिन बनवण्यात भारताचाही समावेश आहे.

Most Powerful Locomotive: तुम्ही अनेकदा रेल्वे इंजिन पाहिलं असेल. जगातील काही शक्तीशाली इंजिनमध्ये रेल्वे इंजिनचा समावेश होतो. पण, या इंजिनची निर्मिती कुठं होते आणि जगातील जगातील सर्वात शक्तिशाली रेल्वे इंजिन कोणत्या देशात बनवतात, हे तुम्हाला माहित आहे का? तुम्हाला ऐकून अभिमान वाटेल की, जगातील सर्वात शक्तिशाली रेल्वे इंजिन बनवणाऱ्या देशांमध्ये भारताचेही नाव आहे.

12,000 हॉर्सपॉवर क्षमतेचे रेल्वे इंजिन मेक इन इंडिया अंतर्गत भारतात तयार करण्यात आले आहे. भारतासह फक्त 6 देश आहेत, जिथे 12000 HP इंजिनची निर्मिती होते.

भारताव्यतिरिक्त रशिया, चीन, फ्रान्स, जर्मनी आणि स्वीडनमध्ये 12,000 हॉर्सपॉवर क्षमतेचे रेल्वे इंजिन बनवतात. सध्या भारतातील रेल्वे इंजिने फ्रेंच कंपनीच्या सहकार्याने बनवली जात आहेत. ही मधेपुराच्या इलेक्ट्रिक लोकोमोटिव्ह कारखान्यात बनवली जातात.

इंजिनचा वेग 120 किमी प्रतितास- आत्तापर्यंत देशात अशी 100 शक्तिशाली रेल्वे इंजिन बनवली गेली आहेत आणि आता आणखी 800 इंजिन बनवली जाणार आहेत. जगात प्रथमच, फक्त भारताने ब्रॉडगेज रेल्वे मार्गावर WAG 12 B नावाचे हे शक्तिशाली रेल्वे इंजिन चालवले आहे.

यामध्ये जीपीएस देखील देण्यात आले आहे, ज्याच्या मदतीने हे इंजिन कुठेही ट्रॅक केले जाऊ शकते. हे इंजिन ताशी 120 किलोमीटर वेगाने धावू शकते. याच्या मदतीने, भारतातील मालवाहतूक गाड्यांचा सरासरी वेग आणि भार वाहून नेण्याची क्षमता सुधारत आहे.

एक्सल लोड 25 टन पर्यंत वाढवता येतो- मधेपुरामध्ये बनवलेली इंजिने ट्विन बो-बो डिझाइनची आहेत. या रेल्वे इंजिनचा एक्सल लोड 22.5 टन आहे, जो 25 टन पर्यंत वाढवता येतो. उंचीवर माल वाहून नेण्याची क्षमता या इंजिनची आहे. मास्टर लोकोमध्ये काही दोष असल्यास, स्लेव्ह लोकोच्या सामर्थ्याने कार्य केले जाऊ शकते.

भार कमी झाल्यास दोनपैकी एक इंजिन बंद करूनही काम करता येते. याची लांबी 35 मीटर असून त्यात 1000 लीटर उच्च कॉम्प्रेसर क्षमतेच्या दोन एमआर टाक्या बसवण्यात आल्या आहेत. हे इंजिन लांब पल्ल्याचा भार सहजतेने हाताळण्यास सक्षम आहे.