भारतीय लष्कराचं सामर्थ्य वाढणार, T-90 MS रणगाडे दाखल होणार

By ऑनलाइन लोकमत | Published: April 10, 2019 09:22 PM2019-04-10T21:22:31+5:302019-04-10T21:29:00+5:30

भारताच्या ताफ्यात लवकरच T-90 MS रणगाडे दाखल होणार आहेत. भारताने रशियाकडून T-90 MS बनावटीचे 464 रणगाडे खरेदी करण्यास मंजुरी दिली आहे. यासाठी केंद्रानं 13,500 कोटींच्या या संरक्षण व्यवहाराला मान्यता दिली आहे.

T-90MS रणगाडे हे रात्रीच्या अंधारातही शत्रूला अचूक हेरून हल्ला करू शकतात.T-90MS रणगाडे एका जागेहून दुसऱ्या जागी सहजगत्या नेता येतात.

नवे रणगाडे आल्यानंतर ही संख्या 2 हजारांवर जाणार आहे.

भारताकडे सध्या T-90 या प्रकारातले जवळपास 1650 रणगाडे आहेत. नवे रणगाडे आल्यानंतर ही संख्या 2 हजारांवर जाणार आहे.

भारताच्या लष्करात T-90 आणि T-72 हे दोन प्रकारचे रणगाडे असून, मेक इन इंडियांतर्गत नवे रणगाडे बनवण्यासाठी भारत प्रयत्नशील आहे.

रशियाकडून खरेदी करण्यात येणारे रणगाडे हे T-90 या प्रकारातलेच अद्ययावत करण्यात आलेले रणगाडे असणार आहेत.