महत्त्वाच्या घडामोडी (२५ नोव्हेंबर)

By admin | Published: November 25, 2014 12:00 AM2014-11-25T00:00:00+5:302014-11-25T00:00:00+5:30

जम्मू व काश्मिरमधल्या विधानसभेच्या १५ जागांसाठी पहिल्या टप्प्यातील मतदान मंगळवारी झाले. दुपारी २ वाजेपर्यंत ४६.५ टक्के मतदान झाले असून मतदारांनी फुटीरतावाद्यांच्या बहिष्काराच्या आवाहनाला न जुमानता सकाळपासून रांगा लावून आपला हक्क बजावला. २००८मध्ये ६० टक्के मतदान झाले होते यावेळी ६२ ते ६५ टक्के असे विक्रमी मतदान होईल असा अंदाज आहे.

वाणिज्य व उद्योग खात्याच्या मंत्री निर्मला सीतारामन यांनी अमेरिकेचे ट्रेड रिप्रेझेन्टेटिव्ह व बराक ओबामांचे मुख्य सल्लागार मायकेल फ्रोमन यांच्याशी दिल्लीमध्ये चर्चा केली.

प्रसिद्ध कथ्थक नर्तिका सितारादेवी यांचे मुंबईमध्ये प्रदीर्घ आजाराने ९४व्या वर्षी निधन झाले. त्यांचा संग्रहित फोटो.

कच्च्या पोलादाच्या उत्पादनामध्ये जगातल्या देशांच्या तुलनेत चीन किती पुढे आहे याची झलक दाखवणारे पीटीआयचे ग्राफिक.

गो-या पोलीसाने चोरी करताना सापडलेल्या कृष्णवर्णी तरुणाला गोळ्या घालून मारल्याप्रकरणी ग्रँड ज्युरींनी डेरेन विल्सन या पोलीस अधिका-याला दोषी धरले नाही. यामुळे फर्ग्युसन व न्यूयॉर्कमध्ये संतापलेल्या कृष्णवंशीयांनी जाळपोळ करून आपला रोष व्यक्त केला. ओबामांसह अनेक ज्येष्ठांनी तीन कृष्णवंशीयांचा समावेश असलेल्या ग्रँड ज्युरींच्या निर्णयाचा मान राखण्याचे आवाहन केले आहे.

झारखंडमधील विधानसभेच्या निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात मतदानासाठी रांगा लावलेल्या महिला.

मंगळवारी १० जनपथ येथे काँग्रेसच्या कार्यकारिणीची बेठक झाली. यावेळी उपस्थित काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी व माजी पंतप्रधान मनमोहन सिंग

मंगळवारी यशवंतराव चव्हाणांच्या ३०व्या स्मृतीदिनी कराड येथे शरद पवारांनी त्यांच्या राजकीय गुरुंना आदरांजली वाहिली.

मंगळवारी संसदेच्या हिवाळी अधिवेशनामध्ये काँग्रेसच्या खासदारांनी विदेशातील काळ्या पैशाच्या मुद्यावरून प्रचंड गोंधळ घातला. यादरम्यानचे हे दृष्य.

ठाणे जिल्ह्यातील बदलापूर रेल्वे स्थानकाजवळ ब-याच दिवसांपासून साईडिंगला थांबलेल्या लोकल ट्रेनमध्ये मंगळवारी दुपारी भीषण आग लागली. या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नसून आगीचे कारणही अद्याप समजू शकलेले नाही.