IAS टॉपर टीना डाबी आणि अतहर आमिर विवाहबंधनात

By ऑनलाइन लोकमत | Published: April 9, 2018 08:13 PM2018-04-09T20:13:36+5:302018-04-09T20:13:36+5:30

नवी दिल्ली : 2015 च्या बॅचचे यूपीएससी टॉपर टीना डाबी आणि अतहर आमिर विवाहबंधनात अडकले आहेत.

या दोघांनी गेल्या शनिवारी काश्मीरमधील पहलगामध्ये विवाह केला.

अतहर आमिर हे मूळचे काश्मीरमधील आहेत. 2015 मध्ये ते यूपीएससीमधील सेकंड टॉपर होते.

आयएएसचे ट्रेनिंग सुरु असताना टीना डाबी आणि अतहर आमिर एकमेकांच्या प्रेमात अडकले होते.

टीना डाबीने याआधी फेसबुकच्या माध्यमातून दोघांच्या विवाहासंदर्भात माहिती दिली होती.

यावेळी दोघांचे फोटो तिने फेसबुकवर शेअर केले होते. मात्र, लग्न कधी होणार आहे, ती तारीख तिने दिली नव्हती.

टॅग्स :लग्नmarriage