शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

हवाई दलाचं हेलिकॉप्टर कोसळलं अन् होत्याचं नव्हतं झालं; पाहा थरकाप उडवणारे फोटो

By ऑनलाइन लोकमत | Published: December 08, 2021 2:38 PM

1 / 6
भारतीय हवाई दलाच्या हेलिकॉप्टरचा भीषण अपघात झाला आहे. कर्नाटकातील उटीजवळ (Ooty) हेलिकॉप्टर क्रॅश झालं. महत्त्वाचं म्हणजे या हेलिकॉप्टरमध्ये सीडीएस जनरल बिपीन रावत (Bipin Rawat) यांचा समावेश होता.
2 / 6
मिळालेल्या माहितीनुसार, खराब हवामानामुळे हा अपघात घडला. या हेलिकॉप्टरमध्ये चीफ ऑफ डिफेंस स्टाफ बिपिन रावत यांच्या पत्नीही होत्या.
3 / 6
सदर घटनेत ४ जणांचे मृतदेह आढळून आले आहेत. पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत. निलगिरी पर्वत रांगामध्ये आज दुपारी १२ वाजून ४० मिनिटांनी ही घटना घडली आहे.
4 / 6
सीडीएस बिपीन रावत यांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आल्याची माहिती, माजी संरक्षण राज्यमंत्री सुभाष भामरे यांनी दिली आहे. घटनेत ३ गंभीर जखमी झाल्याचं सांगण्यात येत आहे.
5 / 6
तामिळनाडूच्या कुन्नूरमध्ये हे हेलिकॉप्टर कोसळलं आहे. हवाई दलाचे हे Mi-17V5 हेलिकॉप्टर होते.
6 / 6
सीडीएस जनरल बिपीन रावत हे या हेलिकॉप्टरमध्ये प्रवास करत होते. या प्रकरणी चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत, अशी माहिती हवाई दलाने दिली आहे.
टॅग्स :Bipin Rawatबिपीन रावतIndian Armyभारतीय जवानHelicopter Crashहेलिकॉप्टर दुर्घटना