केदारनाथमध्ये जोरदार बर्फवृष्टी, जनजीवन विस्कळीत
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 8, 2017 00:27 IST2017-12-08T00:25:02+5:302017-12-08T00:27:06+5:30

केदारनाथमध्ये जोरदार बर्फवृष्टी झाली आहे.
या बर्फावृष्टीमुळे मंदिर परिसरात 6 इंचापर्यंत बर्फ जमला आहे.
इथलं तापमान 2 अंश सेल्सियस डिग्रीपर्यंत खाली आलं आहे.
बर्फवृष्टीमुळे केदारनाथमधलं जनजीवन विस्कळीत झालं आहे.
रुद्रप्रयाग जिल्ह्यातही मोठ्या प्रमाणात बर्फवृष्टी झाली आहे. त्यामुळे तापमान 4 डिग्रीहून कमी खाली आले असून, उत्तराखंडही गारठलं आहे.