HAPPY BIRTHDAY अवकाशकन्या कल्पना चावला

By admin | Published: March 17, 2017 12:00 AM2017-03-17T00:00:00+5:302017-03-17T00:00:00+5:30

प्रथम अंतराळात पाऊल ठेवल्यानंतर कल्पना म्हणाली होती की जेव्हा तुम्ही ताऱ्यांकडे किंवा आकाशगंगेकडे पाहता तेव्हा तुम्ही जमिनीच्या एखाद्या तुकड्यावरून नव्हे तर सौरगंगेतून पाहत असता.

1 फेब्रुवारी 2003 हा दिवस हा संपूर्ण जगासाठी काळा दिवस ठरला. कल्पनासह सुमारे 6 अंतराळवीरांच्या यानाच्या अपघातात मृत्यू झाला होता. नासाचे कोलंबिया यान अंतराळातून परतताना पृथ्वीच्या कक्षेत प्रवेश करत असताना कोसळल्याने झालेल्या अपघातात या सर्वांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता.

अंतराळक्षेत्रातील योगदानासाठी कल्पनाला अनेक पुरस्कार मिळाले होते. स्पेस मेडल ऑफ ऑनर नासा स्पेस फ्लाइट मेडल आणि नासा डिस्टींग्वीश्ड सर्व्हीस मेडल यांचा त्यात प्रामुख्याने समावेश होता.

1991 मध्ये अमेरिकेचे नागरिकत्व मिळाल्यानंतर कल्पनाने नासामध्ये अॅस्ट्रोनॉट कॉर्प्सचे सदस्यत्व मिळवण्यासाठी अर्ज केला होता.

अॅस्ट्रॉनॉट बनण्यासाठी कल्पनाला आणखी उच्चशिक्षण घेणे गरजेचे होते. त्यामुळे 1986 मध्ये तिने आणखी एक मास्टर डीग्री मिळवली. तर 1988 मध्ये एअरोस्पेस इंजिनिअरींग विषयात पीएचडी पूर्ण केली.

कल्पनाने जीन पिएरे हॅरिसन यांच्याशी 1983 साली विवाह केला. ते फ्लाइंग इन्स्ट्रक्टर होते. तसेच अंतराळ क्षेत्राविषयीचे लेखकही होते.

मॉन्टो हे कल्पनाचे टोपण नाव होते.

नासामध्ये काम करण्याचे ध्येय ठेवूनच कल्पना 1982 मध्ये अमेरिकेत गेली. त्याठिकाणी तिने एअरोस्पेस इंजिनिअरींगमध्ये एमएससीची पदवी मिळवली. 1984 मध्ये टेक्सास विद्यापीठातून तिनं ही पदवी मिळवली

कल्पनाचे शालेय शिक्षण कर्नाल येथेच पूर्ण झाले. पहिल्या पाच क्रमांकामध्ये कल्पना नेहमी असायची.

17 मार्च 1962 रोजी हरियाणाच्या कर्नाल येथे कल्पनाचा जन्म झाला. तिचे कुटुंब हे एक मध्यमवर्गीय भारतीय कुटुंब होते.