शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

गुजरात निवडणुकीत ‘आप’-काँग्रेस भाजपच्या नाकी नऊ आणणार? मोदी-शाहांना गड राखण्यात यश येणार!

By ऑनलाइन लोकमत | Published: November 08, 2022 12:21 PM

1 / 12
केंद्रीय निवडणूक आयोगाने गुजरात विधानसभेचा निवडणूक कार्यक्रम जाहीर केला आहे. गुजरातमध्ये दोन टप्प्यांत निवडणूक होणार आहे. या निवडणुकीत आम आदमी पक्ष रिंगणार असून, दिल्ली आणि पंजाबप्रमाणे गुजरातमध्ये आपची जादू चालते का, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागलेले आहे. (gujarat assembly election 2022 astrology prediction)
2 / 12
गत निवडणुकीत भाजपला १०० जागांपर्यंत मर्यादित ठेवण्यास विरोधकांना यश आले होते. त्यामुळे भाजप मुसंडी मारत गड राखू शकणार का, याविषयीही चर्चा सुरू झालेल्या आहेत. याशिवाय काँग्रेस नेते आणि खासदार राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा सुरू आहे. याचा फायदा काँग्रेसला होणार की जागा घटणार हेही पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. (gujarat assembly election 2022)
3 / 12
ज्योतिषशास्त्रानुसार भाजप, आम आदमी पक्ष आणि काँग्रेससाठी निवडणूक कशी असू शकेल, याबाबत काही अंदाज बांधण्यात येत आहेत. अरविंद केजरीवाल आणि राहुल गांधी भाजपला तगडे आव्हान देण्यात यशस्वी ठरणार की, भाजपची मोदी-शाह जोडगोळी विरोधकांना चितपट करून गड राखणार, हे जाणून घेऊया...
4 / 12
आम आदमी पार्टी (AAP) ची स्थापना कुंडली २६ नोव्हेंबर २०१२ रोजी दुपारी १२ वाजता मकर लग्नाची आहे. यावेळेस चंद्र मेष राशीत आहे. आपल्या स्थापनेच्या एक वर्षानंतर या पक्षाने दशमात योगकारक शुक्र, लग्नेश शनी आणि नवमेश बुध यांच्या राजयोगामुळे दिल्ली राज्याची सत्ता काबीज केली. यानंतर पंजाबमध्येही सत्तांतर घडवून आणले. आपल्या पक्षाची क्षमता वाढवून त्याचा राष्ट्रीय विस्तार करण्याचा प्रयत्न अरविंद केजरीवाल करताना दिसत आहेत.
5 / 12
दिल्ली, पंजाब आणि गोव्यात, AAP ला राज्यस्तरीय पक्षाचा दर्जा आहे आणि आगामी विधानसभा निवडणुकीत पक्षाला एखाद्या राज्यात 6 टक्केपेक्षा जास्त मते मिळाल्यास, त्याला राष्ट्रीय पक्षाचा दर्जा मिळेल, असा निवडणूक आयोगाचा नियम आहे.
6 / 12
ज्योतिषाच्या दृष्टिकोनातून शुक्रात गुरु आणि राहुची विष्णोत्तरी दशा सुरू असणारा आम आदमी पक्ष गुजरात विधानसभा निवडणुकीत चांगली कामगिरी करेल, असा अंदाज वर्तवला जात आहे. शुक्र आपच्या कुंडलीत दहाव्या घरात राजयोगात आहे. पण अंतर्दशा नाथ गुरु पाचव्या भावात शत्रू राशीत आहे आणि केतूच्या संयोगात आहे.
7 / 12
दशानाथ, शुक्र आणि गुरु एकमेकांपासून राशी आणि नवांश या दोन्ही ग्रहांच्या ६/८ व्या स्थानांवर आहेत. यामुळे आम आदमी पक्ष गुजरात निवडणुकीत सत्ताधारी भाजपला कडवे आव्हान देऊ शकते, असे सांगितले जात आहे.
8 / 12
दुसरीकडे काँग्रेस पक्षाची स्थापना कुंडली इंदिरा गांधी यांनी २ जानेवारी १९७८ रोजी पक्षाच्या विभाजनाच्या वेळी घेतली आहे. ज्यामध्ये मीन राशीचा उदय होत आहे आणि चंद्र कन्या राशीत राहुशी युतीत आहे.
9 / 12
सध्या ०९ ऑक्टोबरपासून गुरु ग्रहातील राहुची दशा सुरू झाली आहे. राहूच्या केंद्रस्थानी पाचव्या चंद्राच्या युतीमुळे भारत जोडो यात्रेमुळे काँग्रेस पक्षाला चांगली प्रसिद्धी मिळू शकते. परंतु पराशरी नियमानुसार कोणताही ग्रह त्याच्या दशा किंवा अंतर्दशात प्रारंभी पूर्ण परिणाम देऊ शकत नाही.
10 / 12
त्यामुळे गुजरातमध्ये काँग्रेसला पुन्हा एकदा विरोधात बसावे लागू शकते, असा अंदाज बांधला जात आहे. जैमिनी चर दशानुसार, कॉंग्रेस कन्या राशीत मकर राशीची दशा सुरू आहे. ज्यामध्ये बहुतेक ग्रह मकर राशीपासून बाराव्या स्थानी ग्रहकारक दृष्टि पडलेली आहे. त्यामुळे याचे साधारण परिणाम मिळू शकतात, असे सांगितले जात आहे.
11 / 12
- सदर माहिती सामान्य गृहीतके आणि ज्योतिषीय मान्यतांवर आधारित असून, संबंधित विषयासंदर्भात संबंधित तज्ज्ञ व्यक्तींचा सल्ला उपयुक्त ठरू शकेल, असे सांगितले जात आहे. गुजरात विधानसभा निवडणुकीचे बिगुल वाजले असून, राज्यातील १८२ मतदार संघांसाठी निवडणुकीची घोषणा करण्यात आली आहे.
12 / 12
केंद्रीय निवडणूक आयोगाने पत्रकार परिषद घेऊन निवडणूक कार्यक्रम जाहीर केला. गुजरातमध्ये एकूण दोन टप्प्यात मतदान होणार असून, पहिल्या टप्प्यातील मतदान १ डिसेंबर मतदान होणार आहे. तर दुसऱ्या टप्प्यातील मतदान ५ डिसेंबर रोजी होईल. मतमोजणी ८ डिसेंबर रोजी होणार आहे.
टॅग्स :Gujarat Assembly Election 2022गुजरात विधानसभा निवडणूक 2022Astrologyफलज्योतिषZodiac Signराशी भविष्यBJPभाजपाcongressकाँग्रेसAam Admi partyआम आदमी पार्टी