विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षण घेता येत नव्हते म्हणून शिक्षकाने लढवली 'अशी' शक्कल...
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 29, 2021 17:53 IST
1 / 8गेल्या वर्षभरापासून जगभरात कोरोना व्हायरसचा हाहाकार माजला आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी अनेक देशात लॉकडाऊन करण्यात आले. तरीही कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढत होत आहे.2 / 8देशात सुद्धा कोरोना रुग्णसंख्येत दिवसागणिक वाढ होताना दिसून येत आहे. या कोरोनावर नियंत्रण मिळवण्यासाठी सरकारकडून अनेक निर्बंध घातले जात आहेत. तसेच, लोकांना कोरोनावरील लसीकरण केले जात आहे. 3 / 8कोरोना प्रादुर्भावामुळे जगात मोठा बदल झाला आहे. याचा मुलांच्या शिक्षणावर प्रचंड परिणाम झाला आहे. मुलांना मोबाईल, लॅपटॉपच्या माध्यमातून ऑनलाईन अभ्यास करावा लागतो.4 / 8यातच, योग्य नेटवर्क नसल्यामुळे गावात शिकणार्या मुलांच्या शिक्षणावर अधिक परिणाम झाला आहे. मध्य प्रदेशातील सागर जिल्ह्यात गरीब मुलांच्या शिक्षणावर परिणाम होऊ नये, यासाठी सरकारी शाळेतील एका शिक्षकाने चालती-फिरती लायब्ररी तयार केली आहे.5 / 8मध्य प्रदेशातील सागर जिल्ह्यातील सरकारी शाळेतील शिक्षक सी.एच. श्रीवास्तव यांनी आपल्या स्कूटरवर चालती-फिरती लायब्ररी तयार केली आहे. या लायब्ररीत मुलांच्या अभ्यासक्रमाशी संबंधित सर्व पुस्तकांबरोबरच इतर महत्वाची पुस्तकेही आहेत. मुले ही लायब्ररी खूप चांगल्या प्रकारे वापरत आहेत आणि मन लागून अभ्यास करत आहेत.6 / 8शिक्षक सी. एच. श्रीवास्तव यांनी सांगितले की, 'या लायब्ररीचा वापर करणारी बहुतेक मुले गरीब कुटुंबातील आहेत. आर्थिक अडचणींमुळे ते फोन आणि लॅपटॉप विकत घेऊ शकत नाहीत आणि कोरोनामुळे या मुलांच्या शिक्षणावर मोठा परिणाम झाला आहे. याचा विचार करून ही मुले अभ्यास करू शकतील म्हणून एक लहान लायब्ररी तयार केली आहे.'7 / 8या लायब्ररीत मुलांच्या अभ्यासक्रमांशी संबंधित पुस्तकांच्या व्यतिरिक्त कथा, कवितांची अनेक पुस्तके उपस्थित आहेत. मुले या पुस्तकांचा खूप आनंद घेत आहेत. शिक्षक सी.एच. श्रीवास्तव यांच्या या निर्णयाचे सर्वत्र कौतुक होत आहे.8 / 8दुसरीकडे, अरुणाचल प्रदेशातील पापुम पारे जिल्ह्यातील रहिवासी असलेल्या नेंगुरंग मीणा यांनी आपल्या राज्यातील पहिली रोड साइड लायब्ररी उघडली. ही लायब्ररी उघडण्यामागील त्यांचा हेतू मुलांमध्ये वाचनाची सवय विकसित करणे हा होता.