गौतम गंभीरचाही पुढाकार...! महागाईच्या काळातही दिल्लीत पाच रूपयांत मिळतंय जेवण

By ऑनलाइन लोकमत | Published: October 4, 2023 05:19 PM2023-10-04T17:19:50+5:302023-10-04T17:22:20+5:30

दिल्लीत गोरगरिबांच्या पोटाची भूक भागवण्यासाठी काही ठिकाणी ५ रुपयांत जन रसोईच्या माध्यमातून जेवण दिले जाते.

'दिल वालों की दिल्ली' म्हणून सर्वदूर प्रसिद्ध असलेल्या राजधानी दिल्लीत अनेक आठवणींचा खजिना आहे. जुन्या परंपरा, वेशभूषा आणि तेथील खाद्य पदार्थांची ख्याती जगभर आहे.

दिल्लीत गोरगरिबांच्या पोटाची भूक भागवण्यासाठी काही ठिकाणी ५ रुपयांत जन रसोईच्या माध्यमातून जेवण दिले जाते.

येथील 'दादी की रसोई' इथे भात, डाळ, रोटी, कोशिंबीर आणि मिठाई इत्यादी पदार्थांचा आस्वाद घेता यतो. हे हॉटेल गंगा कॉम्प्लेक्स, नोएडा सेक्टर २९ मध्ये आहे.

हे स्वयंपाक घर दुपारी १२ ते २ या वेळेत सुरू असते. त्याची सुरुवात भारताचा माजी क्रिकेटपटू आणि विद्यमान खासदार गौतम गंभीर याने मागील वर्षी डिसेंबरमध्ये गांधी नगरमध्ये केली होती. इथे केवळ एक रूपयात जेवण मिळते.

याशिवाय दिल्लीतील देवदूत फूड बँकेत ५ रुपयांत पोटभर जेवण मिळते. सदर बाजार येथील जैन मंदिराजवळ ही फूड बँक आहे. ही एनजीओ पंकज गुप्ता आणि विपिन गुप्ता हे दोन भाऊ संयुक्तपणे चालवतात.

ग्रेटर नोएडा पश्चिम भागात नेफोवा इथे देखील स्वस्तात जेवणाची सोय आहे. या सर्व्हिस फ्लॅटमध्ये राहणारे लोक मिळून लोकांना ही सुविधा पुरवतात. येथे दररोज जवळपास ५०० लोकांना पाच रूपयांत जेवण दिले जाते.

दरम्यान, राजधानीतील हरी नगरमध्ये श्री राम रसोई नावाचे स्वयंपाकघर चालवले जाते, जिथे गरजूंना केवळ एक रुपयांत पोटभर जेवण दिले जाते.

लोकांमध्ये उपकाराची भावना राहू नये म्हणून एका रूपयांत जेवण दिले जाते. या थाळीत दोन रोट्या, भात आणि दोन भाज्या दिल्या जातात.