Flash Back जून २०१४
By admin | Updated: December 22, 2014 00:00 IST2014-12-22T00:00:00+5:302014-12-22T00:00:00+5:30
जवळ आलेल्या विधानसभांच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी मराठा समाजाबरोबरच मुस्लीमांनाही ४.५ टक्क्यांचे आरक्षण देण्याचा घाट घातला.
शंभर दिवसात काळा पैसा परत आणू अशा वल्गना निवडणुकीच्या काळात केलेल्या भाजपाला स्वित्झर्लंडने भारत सरकारला दिलासा दिला. स्विस बँकांत खाती असलेल्या भारतीयांची यादी देण्याचे स्विस सरकारने कबूल केले.
फूटबॉल वर्ल्ड कपमध्ये इंग्लंडच्या बलाढ्य संघाला कोस्टारिकाने हरवले आणि इंग्लंडचा संघ स्पर्धेच्या बाहेर फेकला गेला.
केंद्र सरकारने कडू निर्णय घेण्यास सुरूवात केली. रेल्वे प्रवास १४ टक्क्यांनी महागला तर रेल्वेच्या मालवाहतुकीचे दर ६.५ टक्क्यांनी वाढवले.
केंद्रात सत्ताबदल झाल्यानंतर आधीच्या सरकारनं नियुक्त केलेल्या राज्यपालांना पद सोडण्यास सांगण्याचे प्रकार घडले. महाराष्ट्रातही आपल्याला राजीनामा देण्यास सांगण्यात येत असल्याचा आरोप के. शंकरनारायण यांनी केला. अखेर त्यांच्या जागी भाजपाने विद्यासागर राव यांची नियुक्ती केलीच.
नेस वाडियाने चारचौघात आपला विनयभंग केल्याची तक्रार त्याची एकेकाळची खास मैत्रीण असलेल्या प्रिती झिंटाने केला आणि क्रीडा तसेच चित्रपट उद्योगात चर्चेला निमित्त मिळाले.
अखेर आयपीएलच्या सातव्या मोसमात कोलकाता नाइटरायडर्सने विजेतेपद मिळवले. अंतिम सामन्यात कोलकाताने दिल्ली किंग्ज इलेवनचा तीन गडी राखून पराभव केला.
महाराष्ट्राला चांगलाच धक्का देणारी दुर्देवी घटना ३ जून २०१४ या दिवशी दिल्लीत घडली. कार अपघातात गोपीनाथ मुंडे यांचे दुर्दैवी निधन झाले. महाराष्ट्रात भाजपाला सत्तेत बघण्याचे स्वप्न मुंडेंनी बघितलं परंतु सत्ता मिळवलेली बघण्यासाठी ते राहिले नाहीत.
१ जून २०१४ या दिवशी तेलंगणा राज्याची निर्मीती झाली. अनेक दशकांच्या संघर्षानंतर तेलंगणा राष्ट्र समितीला यश आले आणि आंध्र प्रदेशमधून तेलंगणा राज्य वेगळे करण्यात आले. देशातले २९ वे राज्य झालेल्या तेलंगणाचे पहिले मुख्यमंत्री म्हणून टीआरएसच्या के. चंद्रशेखर राव यांनी शपथ घेतली.