बंगळुरूमध्ये पत्त्यांप्रमाणे कोसळली इमारत
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 16, 2018 15:30 IST2018-02-16T15:29:07+5:302018-02-16T15:30:44+5:30

बंगळुरुतील आयटी हब व्हिटफील्ड परिसरातील शरजाहपूर रोडजवळील कसावनाहल्ली येथे बांधकाम सुरू असलेली 5 मजली इमारत कोसळली आहे. ढिगा-याखाली 18 जण अडकले होते.
पोलीस व अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी दाखल होत बचावकार्य सुरू केले.
अथक प्रयत्न करत 7 मजुरांना ढिगा-याखालून जिवंत बाहेर काढण्यात आले. मात्र, तीन जणांचा मृत्यू झाल्याची माहिती बचाव पथकाच्या अधिका-यांनी दिली.
इमारतीचा पाया कमकुवत असल्यानं ही दुर्घटना घडल्याची माहिती समोर आली आहे.
शहरातील एच.एस.आर लेआउट येथे राहणारा बिल्डर रफ़ीकच्या मालकीची ही इमारती होती. त्याचा शोध सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.