'सिंधू नेत्र' : अवकाशातून उपग्रह करणार सीमांचे रक्षण; कुरापतखोर शेजाऱ्यांवर नजर ठेवणार
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 2, 2021 08:14 IST2021-03-02T07:05:05+5:302021-03-02T08:14:56+5:30
DRDO's 'Sindhu Netra' surveillance satellite deployed in space : सॅटेलाइटच्या मदतीने शत्रूच्या हालचालींवर बारकाईने नजर ठेवणार

देशाच्या सीमांचे रक्षण करण्यासाठी लष्कर सदैव सज्ज असले तरी सॅटेलाइटच्या मदतीने शत्रूच्या हालचालींवर बारकाईने नजर ठेवणे आता गरजेचे झाले आहे.
त्यामुळेच अनेक देश अवकाशात आपले उपग्रह सोडून आपल्या शत्रूवर करडी नजर ठेवत असतात. असाच एक उपग्रह भारताने रविवारी अवकाशात सोडला. ‘सिंधू नेत्र’ असे या उपग्रहाचे नाव आहे. त्याविषयी...
‘सिंधू नेत्र’ उपग्रहाची निर्मिती कोणी केली?
संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेच्या (डीआरडीओ) तरुण शास्त्रज्ञांचा उपग्रहाची निर्मिती करण्यात मोठा वाटा आहे. इस्रोने पीएसएलव्ही-सी५१ याच्या साहाय्याने तो अवकाशात स्थिर करण्यात आला.
दक्षिण चीन समुद्रावर लक्ष
‘सिंधू नेत्र’ दक्षिण चीन समुद्र, एडनचे आखात आणि आफ्रिकी किनारपट्ट्या, जिथे समुद्री चाचांचा उपद्रव असतो, या भागांवर लक्ष ठेवण्यासाठी उपयुक्त ठरणार आहे.
करडी नजर ठेवणार
४,००० किमी अंतराच्या चीन सीमेवरही ‘सिंधू नेत्र’ करडी नजर ठेवणार आहे. त्यामुळे चीनच्या कुरापतींना चांगलाच फटका बसणार असून घुसखोरीला आळा घातला येणार आहे.
का सोडला उपग्रह?
लडाखमध्ये चिनी लष्कराशी तणाव निर्माण झाल्याने ‘सिंधु नेत्र’ सारख्या समर्पित उपग्रहाची नितांत आवश्यकता भासू लागली होती. तसेच, पाकिस्तानी घुसखोरांचा बंदोबस्त करणे भाग आहे.
४ ते ६ समर्पित उपग्रहांची मागणी
४ ते ६ समर्पित उपग्रहांची मागणी लष्करातर्फे करण्यात आली होती. ऑगस्ट महिन्यात सीमा सुरक्षा दलाने हाय रेझोल्युशन सेन्सर्स आणि कॅमेरांची आवश्यकता स्पष्ट केली होती.
पीएसएलव्ही-सी५१
हा असा पहिला उपग्रह आहे की जो चीनला खेटून असलेल्या लडाख परिसरात तसेच पाकिस्तानलगतच्या सीमारेषांवरील गस्तीसाठी उपयुक्त ठरू शकेल.