Corona Vaccination: कोरोना लसीचा दुसरा डोस घेण्यास विलंब होतोय? पुन्हा दोन डोस घ्यावे लागणार का? काय म्हणतात तज्ज्ञ....

Published: May 12, 2021 10:11 AM2021-05-12T10:11:39+5:302021-05-12T10:17:36+5:30

Corona Vaccination Delay in Second dose: देशभरात कोरोना लसींची टंचाई (Corona Vaccine Shortage) निर्माण झाली आहे. यामुळे 45 वर्षांवरील लोकांना पहिला डोस मिळून महिना-दीड महिना उलटला तरी देखील दुसरा डोस मिळत नाहीय. लसीकरण केंद्रांवर लसच उपलब्ध नाही, किंवा पुरेशी आली नसल्याने रांगेत उभे राहून माघारी परतावे लागत आहे. यामुळे पहिला डोस घेतलेला वाया जाणार का? असा प्रश्न लस घेतलेल्या नागरिकांना पडला आहे.

देशभरात कोरोना लसींची टंचाई (Corona Vaccine Shortage) निर्माण झाली आहे. यामुळे 45 वर्षांवरील लोकांना पहिला डोस मिळून महिना-दीड महिना उलटला तरी देखील दुसरा डोस मिळत नाहीय. लसीकरण केंद्रांवर लसच उपलब्ध नाही, किंवा पुरेशी आली नसल्याने रांगेत उभे राहून माघारी परतावे लागत आहे. यामुळे पहिला डोस घेतलेला वाया जाणार का? असा प्रश्न लस घेतलेल्या नागरिकांना पडला आहे. तसे झाले तर पुन्हा दोन डोस घ्यावे लागणार का? असाही प्रश्न उभा ठाकला आहे. (Is there need to third dose of corona vaccine, when second dose not getting on time? Exprerts says)

ज्या लोकांना दुसरा डोस वेळेवर मिळाला नाही, किंवा त्यावेळी आजारी होते, अशा लोकांना तज्ज्ञांनी एक सल्ला दिला आहे. या लोकांना आपल्या शेड्यूलमध्ये कोणताही बदल करू नये असा सल्ला दिला आहे. लक्षात असूदे पहिला डोस दिल्यानंतर चार किंवा सहा आठवड्यांनी दुसरा डोस घेण्यासाठी सांगितले जात आहे.

देशात सध्या कोव्हिशिल्ड आणि कोव्हॅक्सिनचे डोस दिले जात आहेत. नियमानुसार ज्या लसीचा पहिला डोस घेतलाय त्याच लसीचा दुसरा डोस घेणे गरजेचे आहे. सध्यातरी तुम्ही पहिला कोव्हॅक्सिन आणि नंतरचा दुसरा कोव्हिशिल्ड किंवा उलट असे डोस घेऊ शकत नाही.

लसींच्या कॉकटेलवर युरोपमध्ये प्रयोग सुरु आहेत. मात्र, सध्यातरी एकाच लसीचे दोन डोस घ्यावे लागणार आहेत. कोरोना लसीच्या टंचाईमुळे सध्या पहिला डोस घेतलेल्या लोकांची 4 किंवा 6 आठवड्यांची मुदत उलटून गेली आहे. मग अशांना वेळेत लस न मिळाल्याने तिसरा डोस घ्यावा लागेल का, असा प्रश्न पडला आहे.

तज्ज्ञांनी सांगितले की, तुम्ही वेळेवर दुसरा डोस घेऊ शकला नाही तर असे समजू नका की पहिला डोस वाया गेला. दुसरा डोस वेळेवर न मिळाल्याने पुन्हा नवीन शेड्यूलनुसार दोनदा लस घ्यावी लागणार, असा विचार मनातून काढून टाका.

कोणत्याही कारणाने तुम्हाला दुसरा डोस वेळेत मिळाला नाही तरीदेखील तुम्हाला आणखी एकच डोस घ्यावा लागणार आहे. म्हणजेच तिसरा डोस घेण्याची गरज नाही. सातव्या किंवा आठव्या आठवड्यात किंवा त्यानंतर कधीही डोस मिळाला तरीदेखील तो दुसराच असेल.

लसीकरणानंतरच्या परिस्थितींवर लक्ष ठेवणाऱ्या राष्ट्रीय समितीचे अध्यक्ष डॉ. एनके अरोड़ा यांनी सांगितले की, जर दुसरा डोस मिळण्यास उशिर झाला तर चिंतेचे कोणतेही कारम नाही. आम्हाला माहिती आहे, अनेकजणांना दुसरा डोस वेळेवर मिळत नाहीय. पहिल्या डोसनंतर दुसरा डोस घेण्यास 8-10 आठवड्यांचा वेळ लागला तरीदेखील दुसरा डोस तेवढाच प्रभावी असणार आहे.

पुण्यातील IISER च्या डॉ. विनीता बल यांनी सांगितले की, पहिला डोस घेतल्यानंतर शरिरात रोगप्रतिकारक शक्ती तयार होण्यास सुरुवात होते. ती दुसरी डोस घेण्यास उशिर झाला तरी संपत नाही. तुम्ही जोपर्यंत दुसरा डोस घेत नाही तोपर्यंत तुमच्या शरिरात मोठ्या प्रमाणावर रोगप्रतिकारक शक्ती तयार होत नाही. एवढाच फरक आहे. यामुळे दुसरा डोस घ्यावा.

दुसरा डोस घ्यावा. दुसऱा डोस घेतल्याने पहिल्या डोसची ताकद वाढते. पहिल्या डोसचा परिणाम शरिरावर झालेला असतो. मात्र, त्याची ताकद अर्धी असते. लसीमुळे ज्या अँटीबॉडी तयार होतात, त्य़ा प्रामुख्याने प्रोटीन असतात. जे वेळेनुसार कमी कमी होत जातात. जरी त्यांचा वापर झाला नसेल तरी. त्या वाढविण्यासाठी दुसरा डोस हवा असतो.

कोव्हॅक्सिन बनविणाऱ्या आयसीएमआरने 28 दिवसांचे अंतर ठेवण्यास सांगितले होते. मात्र, त्यापुढील दोन डोसमधील अंतरावर डेटा उपलब्ध नाही. तर कोव्हिशिल्ड वापरणाऱ्या ब्रिटनने दोन डोसमधील अंतर हे 12 आठवड्यांचे ठेवले आहे. कॅनडने हेच अंतर 16 आठवड्यांचे ठेवले आहे.

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!