दिलासादायक! ...म्हणून आता दोन महिन्यातच कोरोनावर औषध उपलब्ध होणार; भारतीय वैज्ञानिकांनी दिली माहिती

By ऑनलाइन लोकमत | Published: June 5, 2020 09:49 AM2020-06-05T09:49:15+5:302020-06-05T10:18:00+5:30

जगभरात कोरोना व्हायरसने थैमान घातलेलं आहे. जगभरात आतापर्यंत ६५ लाखांहून अधिक लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. तर 3 लाख 86 हजार रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

भारतातही दिवसेंदिवस कोरोनाबाधितांची संख्या मोठअया प्रमाणात वाढत आहे. त्यामुळे कोरोनासारख्या संकटावर मात करण्यासाठी सर्व देशातील सरकार मोठ्या प्रमाणात प्रयत्न करत आहे. तसेच कोरोनाच्या उपचारासाठी लसीची चाचणी देखील अनेक देशात करण्यात येत आहे. त्यातच आता एक दिलासादायक माहिती समोर आली आहे.

पुढील दोन ते तीन महिन्यात कोरोना संसर्गावर एकदोन औषधं उपलब्ध होतील, अशी माहिती कौन्सिल ऑफ सायंटिफिक अँन्ड इंडस्ट्रीयल रिसर्चचे (CSRI) महासंचालक शेखर मांडे यांनी दिली आहे.

जागतिक आरोग्य संघटनेने हायड्रोक्सीक्लोरोक्विन औषधाची कोरोना संसर्गावर क्लिनिकल ट्रायल परवानगी दिली आहे. त्यामुळे ही सर्वांसाठी आनंदाची बाब असल्याचे शेखर मांडे यांनी सांगितले.

जागतिक आरोग्य संघटनेने हायड्रोक्सीक्लोरोक्विन औषधाची कोरोना संसर्गावर क्लिनिकल ट्रायल थांबवण्यास सांगितले होते. मात्र, आता पुन्हा हे प्रयोग करण्यास परवानगी दिली आहे.

हायड्रोक्सीक्लोरोक्वविन हे औषध सेफच आहे, पण डॉक्टरला विचारल्याशिवाय ते घेऊ नये, असाही महत्वाचा सल्ला शेखर मांडे यांनी दिला आहे.

तसेच जागतिक आरोग्य संघटनेने पुन्हा हायड्रोक्सीक्लोरोक्विन औषधाचे प्रयोग करण्यास परवानगी दिली आहे. त्यामुळे पुढील दोनतीन महिन्यात कोरोना संसर्गावर औषध उपलब्ध होईल, अशी माहिती शेखर मांडे यांनी दिली आहे.