CoronaVirus : कोव्हॅक्सीन घेतलेल्यांची विचित्र कोंडी, टेन्शन वाढलं...! ठोठावला न्यायालयाचा दरवाजा

By ऑनलाइन लोकमत | Published: August 6, 2021 11:55 AM2021-08-06T11:55:43+5:302021-08-06T12:05:28+5:30

सध्या देशात कोविशिल्ड, कोव्हॅक्सिन आणि रशियाच्या स्पुतनिक-व्ही लसीच्या आपत्कालीन वापरास मंजुरी देण्यात आली आहे. कोविशिल्ड, आणि स्पुतनिक-व्हीला तर जगातील अनेक देशांमध्ये मंजुरी मिळाली आहे.

कोव्हॅक्सिनचे दोन्ही डोस घेतलेल्या एका भारतीय प्रवासी व्यक्तीने केरळ उच्च न्यायालयात याचिका दाखल केली असून आता कोविशिल्ड लस घेण्याची परवानगी मागितली आहे. संबंधित व्यक्तीने म्हटले आहे, की सौदी अरेबियामध्ये कोव्हॅक्सिनला मंजुरी नाही. यामुळे त्याला कामासाठी सौदी अरेबियामध्ये जाणे अशक्य होत आहे. (CoronaVirus Petition files in kerala HC seeking permission to get re vaccinated with covishield vaccine)

...यानंतर, आता केरळ उच्च न्यायालयाने या व्यक्तीच्या याचिकेवर केंद्र सरकारकडून उत्तर मागितले आहे. महत्वाचे म्हणजे, अनेक देशांमध्ये कोव्हॅक्सिनला मंजुरी न मिळाल्याने, तेथे जाणाऱ्या प्रवासी भारतीयांची विचित्र कोंडी झाली आहे.

कोविशिल्ड, स्पुतनिकला मंजुरी - सध्या देशात कोविशिल्ड, कोव्हॅक्सिन आणि रशियाच्या स्पुतनिक-व्ही लसीच्या आपत्कालीन वापरास मंजुरी देण्यात आली आहे. कोविशिल्ड, आणि स्पुतनिक-व्हीला तर जगातील अनेक देशांमध्ये मंजुरी मिळाली आहे.

जागतिक आरोग्य संघटनेच्या इमरजेंसी यूज लिस्टमध्येही कोविशिल्डचा समावेश आहे. सध्या, कोविशिल्डला 30 देशांनी मान्यता दिली आहे. भारताची स्वदेशी कोरोना लस म्हणजे भारत बायोटेकची कोव्हॅक्सिन आहे.

WHO मध्ये सुरू आहे रिव्ह्यू प्रक्रिया - गेल्या महिन्यात भारत बायोटेकने म्हटले हेते, की कोवाक्सिनच्या इमर्जन्सी यूज लिस्टिंगशी (ईयूएल) संबंधित सर्व कागदपत्रे 9 जुलैपर्यंत WHOला सादर करण्यात आली आहेत. आता रिव्ह्यू प्रक्रिया सुरू आहे आणि आम्हाला आशा आहे की कोव्हॅक्सीनला लवकरात लवकर इमर्जन्सी वापराची परवानगी मिळेल.

डब्ल्यूएचओच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार, ईयूएल ही एक अशी प्रक्रिया आहे, ज्या अंतर्गत नव्या अथवा विना परवाना उत्पादनांचा वापर सार्वजनिक आरोग्याच्या आपत्कालीन स्थितीत केला जाऊ शकतो.

कोव्हॅक्सिन लस डेल्टा व्हेरिएंटवर प्रभावी - कोव्हॅक्सिन लस डेल्टा व्हेरिएंटवर प्रभावी आहे, जो आतापर्यंत कोरोनाचा सर्वांत घातक व्हेरिएंट आहे. आयसीएमआरच्या अभ्यासात असे समोर आले आहे की, डेल्टाच्या तिन्ही म्यूटेशनवर कोव्हॅक्सिन लस 77 टक्क्यांपर्यंत प्रभावी आहे. म्हणजेच, या अभ्यासानुसार, जर तुम्हाला कोव्हॅक्सिन लस मिळाली असेल, तर तुम्हाला डेल्टा व्हेरिएंटपासून संरक्षण मिळू शकते.

भारतात सध्या एकूण कोरोना रुग्णांपैकी जवळपास 90 टक्के रुग्ण डेल्टा व्हेरिएंटने बाधित झाल्याचे सांगण्यात येत आहे. तसेच, ब्रिटन आणि अमेरिकेत डेल्टा व्हेरिएंट वेगाने पसरत आहे.

डेल्टा व्हेरिएंट इतर तीन व्हेरिएंट ऑफ कंसर्नच्या (Alpha, Beta, Gama) तुलनेत अधिक वेगाने पसरत आहे आणि रुग्णासाठी देखील धोकादायक ठरत आहे.