शाळा सुरू केल्यावर कोरोनाचा धोका वाढला! 4 पैकी 3 विद्यार्थी पॉझिटिव्ह; रिपोर्टने वाढवली पालकांची चिंता
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 6, 2020 14:04 IST
1 / 15कोरोनामुळे देशात चिंताजनक परिस्थिती निर्माण झाली आहे. देशातील कोरोनाग्रस्तांची संख्या वाढली असून कोरोना रुग्णांचा आकडा हा तब्बल 84 लाखांवर गेला आहे. 2 / 15कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी खबररदारीचे सर्व उपाय करण्यात येत आहेत. लॉकडाऊन सुरू आहे. सोशल डिस्टंसिंग, मास्क, क्वारंटाईनच्या माध्यमातून काळजी घेतली जात आहे. 3 / 15वाढत्या संसर्गामुळे मार्च महिन्यापासून देशभरातील शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी देण्यात आली. कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी आणि विद्यार्थ्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने शाळा-महाविद्यालयं बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला.4 / 15शाळा महाविद्यालये पुन्हा सुरू करण्याच्या दिशेने आता पाऊल उचललं जात आहेत. अनेक राज्यांमध्ये शाळा सुरू करण्यासाठी परवानगी देण्यात आली आहे. मात्र शाळा सुरू करणं महागात पडू शकतं. 5 / 15शाळा सुरू केल्यानंतर कोरोनाचा धोका वाढला असून 4 पैकी 3 विद्यार्थ्यांची चाचणी पॉझिटिव्ह येत आहे. धक्कादायक बाब म्हणजे विद्यार्थ्यांमध्ये कोरोनाची लक्षणं दिसून येत नाहीत. मात्र त्यांची चाचणी पॉझिटिव्ह येत आहेत. 6 / 15दिल्लीच्या एम्स (AIIMS) रुग्णालयाने कोरोना संदर्भात दिलेल्या एका रिपोर्टमधून हा खुलासा करण्यात आला आहे. रिपोर्टने पालकांची चिंता वाढवली असून भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.7 / 15एम्सने प्रसिद्ध केलेल्या रिपोर्टनुसार, सर्व पॉझिटिव्ह रूग्णांपैकी 40% रुग्णांमध्ये लक्षणं दिसत नाहीत. यातील 73.5% रुग्ण 12 वर्षांखालील आहे. अशा मुलांमध्ये कोरोना संसर्ग होतो मात्र लक्षणं दिसत नाहीत. त्यामुळे ही मुलं कोरोना पॉझिटिव्ह आहेत की नाही हे शोधणे फार कठीण आहे.8 / 15गृह मंत्रालयाने प्रसिद्ध केलेल्या गाईडलाइन्सनुसार देशातील जवळपास 10 राज्यांमध्ये शाळा सुरू झाल्या आहेत. यात उत्तर प्रदेश, बिहार, आंध्र प्रदेश यासारख्या मोठ्या लोकसंख्या असलेल्या राज्यांचा समावेश आहे. 9 / 15एम्सच्या अहवालानुसार, कोरोना संक्रमित 4 पैकी 3 मुलांमध्ये अशी कोणतीही लक्षणे दिसत नाहीत जी इतर मुलांसाठी अतिशय धोकादायक असतात. ही मुले सहजपणे दुसर्या मुलास संक्रमित करतात.10 / 15आंध्र प्रदेशमध्ये शाळा सुरू करण्याची परवानगी देण्यात आल्यानंतर शाळा सुरू करण्यात आल्या आहेत. 2 नोव्हेंबरपासून नववी आणि दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी शाळा सुरू झाल्या आहेत. 11 / 15कोरोनाच्या संकटात शाळा सुरू करणं चांगलंच महागात पडलं आहे. जवळपास 262 विद्यार्थी आणि 160 शिक्षकांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती आता समोर आली आहे. 12 / 15एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, 'आंध्र प्रदेशमध्ये 2 नोव्हेंबर रोजी 9 व 10 वीच्या विद्यार्थ्यांसाठी शाळा पुन्हा सुरू करण्यात आल्या. गेल्या तीन दिवसांत जवळपास 262 विद्यार्थी आणि 160 शिक्षकांच्या कोरोना चाचणीचा रिपोर्ट हा पॉझिटिव्ह आला आहे.'13 / 15शाळेतील अनेक विद्यार्थ्यांना कोरोनाची लागण झाल्याने पालकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. तसेच प्रशासनाच्या चिंतेतही भर पडली आहे. 14 / 15कर्नाटकमध्येही याआधी परीक्षा दिल्यानंतर अनेक विद्यार्थ्यांना कोरोनाची लागण झाली होती. कर्नाटक बोर्डाने काही दिवसांपूर्वी SSLC च्या परीक्षा घेतल्या. 15 / 15जवळपास आठ लाखांहून अधिक विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती. ही परीक्षा दिलेल्या तब्बल 32 विद्यार्थ्यांना कोरोनाची लागण झाली होती. विद्यार्थ्यांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याने एकच खळबळ उडाली होती.