Coronavirus In Maharashtra: देशात दिवसभरात ६ हजार ८२२ नव्या कोरोनाबाधितांची नोंद; राज्यातील स्थिती काय?, जाणून घ्या
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 7, 2021 13:05 IST2021-12-07T12:59:34+5:302021-12-07T13:05:32+5:30

गेल्या २४ तासांत दिवसभरात देशात ६ हजार ८२२ नव्या कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. तर २२० रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.
सध्या देशात सक्रिय रुग्णांची संख्या ९५ हजार १४ झाली आहे. त्याचबरोबर कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची संख्या ४ लाख ७३ हजार ७५७ झाली आहे. आतापर्यंत ३ कोटी ४० लाख ७९ हजार ६१२ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.
मुंबईतील दोन लोकांमध्ये ओमायक्रॉनची लागण झाल्याचं समोर आलंय. दोघेही २५ नोव्हेंबर रोजी दक्षिण आफ्रिकेतून परतले होते आणि त्यांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला होता. त्यानंतर विषाणू ओमायक्रॉन आहे की, नाही हे तपासण्यासाठी एनआयव्ही, पुणे येथे जीनोम सिक्वेन्सिंगसाठी नमुना पाठवण्यात आला.
आता त्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे महाराष्ट्रात ओमायक्रॉनची लागण झालेल्यांची संख्या १० झाली आहे. आतापर्यंत, देशात २३ जणांना ओमायक्रॉनची लागण झाली आहे.
दरम्यान, देशव्यापी लसीकरण मोहीमेतंर्गत आतापर्यंत कोरोनावरील प्रतिबंधक लसीचे १२८ कोटींहून अधिक डोस देण्यात आले आहेत. सोमवारी दिवसभरात ७९ लाख ३९ हजार ३८ डोस देण्यात आले. आतापर्यंत १२८ कोटी ७६ लाख १० हजार ५९० डोस लसीचे डोस देण्यात आले आहेत.