CoronaVirus Live Updates : भीषण, भयंकर, भयावह! 'या' शहरात कोरोनाचा हाहाकार; स्मशानभूमीबाहेर लागला 'हाऊस फुल्ल'चा बोर्ड

By ऑनलाइन लोकमत | Published: May 4, 2021 12:57 PM2021-05-04T12:57:32+5:302021-05-04T13:15:25+5:30

CoronaVirus Marathi News and Live Updates : कोरोनामुळे अनेकांचा मृत्यू झाला आहे. स्मशानभूमीबाहेर अंत्यसंस्कारासाठी रांगा लागल्या आहे. हे असतानाच आता आणखी एक धक्कादायक घटना समोर आली आहे.

देशातील कोरोनाग्रस्तांची संख्या वाढली असून रुग्णांचा आकडा 2,02,82,833 वर पोहोचला आहे. कोरोनामुळे आतापर्यंत देशभरात तब्बल 2,22,408 लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे.

देशात गेल्या 24 तासांत कोरोनाचे 3,57,229 नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर 3,449 जणांचा मृत्यू झाला आहे. कोरोनामुळे देशभरात अत्यंत गंभीर परिस्थिती निर्माण झाली असून प्रशासनाची चिंता वाढली आहे.

कोरोना रुग्णांची संख्या सातत्याने वाढत आहे. कोरोनामुळे अनेकांचा मृत्यू झाला आहे. स्मशानभूमीबाहेर अंत्यसंस्कारासाठी रांगा लागल्या आहे. हे असतानाच आता आणखी एक धक्कादायक घटना समोर आली आहे.

कोरोनामुळे सर्वत्र भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. कोरोनामुळे भयावह परिस्थिती निर्माण झाली आहे. मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्यासाठी स्मशानभूमीतही जागा मिळत नसल्याचं भीषण वास्तव आता समोर आलं आहे.

कोरोनामुळे दिवसागणिक परिस्थिती भयंकर होत आहे. कोरोनाने थैमान घातले आहे. राज्यात अनेक ठिकाणी मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्यासाठी स्मशानात जागाही शिल्लक राहिलेली नाही.

कोरोना मृतदेहांवर अंत्यसंस्कार होण्यासाठी बरेच दिवस वाट पाहावी लागत आहे. अंत्यसंस्कारासाठी मृतदेह हे वेटिंग लिस्टवर ठेवण्यात आले आहेत. याच दरम्यान बंगळुरूमध्ये देखील भयावह घटना समोर आली आहे.

कर्नाटकमधील बंगळुरूच्या चामराजपेटमधील एका स्मशानभूमीबाहेर चक्क "हाऊस फुल्ल"चा बोर्ड लावण्यात आला आहे. कोरोनामुळे अचानक मृतांच्या संख्येत वाढ झाली असून, स्मशानभूमीत मोठ्या संख्येनं मृतदेह आणले जात आहेत.

स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यासाठी जागाच शिल्लक नसल्याने बोर्ड लावण्यात आला आहे. स्मशानभूमीत 20 मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्याची व्यवस्था आहे. त्यामुळे अंत्यसंस्कारासाठी नवीन मृतदेह घेण्यास नकार दिला जात आहे.

बंगळुरूमध्ये अशा 13 स्मशानभूमी आहेत, जिथे विद्युत शवदाहिन्या आहेत. मात्र कोरोनाचा उद्रेक झाल्यानंतर आणि मृतांची संख्या वाढल्याने अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे. अंत्यसंस्कारासाठी बराच वेळ वाट पाहावी लागत आहेत.

आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी कोरोनामुळे तब्बल 239 जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे मृतांची संख्या ही 16, 250 वर गेली आहे. तसेच सातत्याने नव्या रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे.

कर्नाटकातील एकूण रुग्णसंख्या रविवारी 16 लाखांवर पोहोचली. राज्यात 37 हजार 733 रुग्ण आढळून आले आहेत. कोरोनामुळे अनेक ठिकाणी परिस्थिती हाताबाहेर गेल्याचं चित्र पाहायला मिळत आहे.

कोरोनाच्या संकटात अनेक गोष्टींसाठी लोकांनी ठिकठिकाणी रांगा लावल्याचं चित्र कित्येकदा पाहायला मिळालं आहे. यातच आता सूरतमधील लोकांना आपल्या नातेवाईकांचे डेथ सर्टिफिकेट मिळवण्यासाठील अडचणींच सामना करावा लागत आहे.

डेथ सर्टिफिकेट मिळवण्यासाठी भल्या मोठ्या रांगा लावाव्या लागत आहेत. शहरातील मृतांची संख्या फार जास्त आहे. सुरतमध्ये सरकारी कार्यालयांच्या बाहेर मृत्यूचं प्रमाणपत्र मिळवण्यासाठी रांगा लागल्या आहेत.

गेल्या महिन्याभरात सुरतमध्ये 500 हून अधिक जणांनी कोरोनामुळे आपला जीव गमावला आहे. मृतांचा हा आकडा अधिकृत आहे. मात्र स्मशानभूमीत अंत्यसंस्कारांसाठी आलेल्या मृतदेहांचा विचार करता खरा आकडा आणखी मोठा असण्याची शक्यता आहे.

कुटुंबातील कोणत्याही सदस्याचा मृत्यू झाल्यानंतर सरकारी कामांसाठी डेथ सर्टिफिकेट म्हणजेच मृत्यूचं प्रमाणत्र हे अत्यंत महत्त्वाचं काददपत्र मानलं जातं. त्यामुळेच ते मिळवण्यासाठी लोक आता सरकारी कार्यालयाबाहेर रांगा लावत आहेत. कित्येक तास रांगेत उभं राहावं लागत असल्याची माहिती अनेकांनी दिली आहे.