हायटेक जपानी मशिन्सच्या सहाय्यानं दिल्लीत रेड अन् ऑरेंज झोनमध्ये सॅनिटायझेशन; जाणून घ्या...

By ऑनलाइन लोकमत | Published: April 14, 2020 03:43 PM2020-04-14T15:43:57+5:302020-04-14T15:53:51+5:30

कोरोना विषाणूच्या वाढत्या संसर्गामुळे दिल्ली सरकारने रेड आणि ऑरेंज झोनचे सोमवारी सॅनिटायझेशनला सुरुवात केली आहे.

दिल्लीतल्या राजेंद्रनगर येथून सुरू करण्यात आलेल्या या फवारणीसाठी सरकारने जपानी हाय-टेक मशीन वापरल्या आहेत.

पीआय इंडस्ट्रीजकडून अशा प्रकारची दहा मशिन्स दिल्ली सरकारला देण्यात आली आहेत. एक मशीन दर तासाला सुमारे 20 हजार चौरस मीटर क्षेत्र सॅनिटायझेशन करते.

यामुळे दिवसभर सरकारला मोठ्या प्रमाणात विविध भागांमध्ये फवारणी करता येणार आहे.

अधिकार्‍यांच्या म्हणण्यानुसार, दिल्ली सरकारने दिल्ली जल बोर्डाच्या मशीन्सही फवारणीच्या कामाला वापरण्यास सुरुवात केली आहे.

सोमवारी सकाळपासून दिल्लीच्या रेड झोन आणि हाय रिस्क झोनचे सॅनिटायझेशन 60 मशीनद्वारे केले जात आहे.

विषाणूचा संसर्ग होण्याचा धोका लक्षात घेता ही मोहीम सुरूच राहणार आहे.

मोहिमेची सुरुवात करताना स्थानिक आमदार आणि दिल्ली जल बोर्डाचे उपाध्यक्ष राघव चढ्ढा म्हणाले की, दिल्ली सरकार कोरोनापासून राजधानीला मुक्त करण्यासाठी कसोशीनं प्रयत्न करत आहे.

हाय-टेक जपानी मशीनद्वारे रेड आणि ऑरेंज झोनचे सॅनिटायझेशन केले जाणार आहे.

विशेष म्हणजे, दिल्ली सरकारने रेड झोन म्हणून त्या भागांची ओळख पटविली आहे, जिथे कोरोना विषाणूची लागण झालेल्या रुग्णानंतर सीलबंद करण्यात आले आहे.

संवेदनशील आणि कनेक्ट केलेले क्षेत्र संक्रमणाच्या दृष्टिकोनातून ऑरेंज झोन म्हणून ओळखले गेले आहेत.