Coronavirus : लग्नाचा वाढदिवस पण ड्युटी फर्स्ट, 'या' डॉक्टर दाम्पत्याचं तुम्हीही कराल भरभरून कौतुक

By ऑनलाइन लोकमत | Published: April 25, 2020 10:23 AM2020-04-25T10:23:31+5:302020-04-25T10:34:18+5:30

Coronavirus : रुग्णांची सेवा करण्यासाठी अनेक डॉक्टर आपल्या कुटुंबापासून दूर राहत आहेत. अशाच एका डॉक्टर दाम्पत्याची प्रेरणादायी घटना समोर आली आहे. लग्नाच्या वाढदिवशी या दाम्पत्याने रुग्णांची सेवा केली आहे.

कोरोना व्हायरसच्या सामना करण्यासाठी देश सज्ज झालेला असतानाच देशातील रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. भारतातील कोरोनाग्रस्तांची संख्या ही 23,000 हून अधिक झाली आहे.

कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी सर्वतोपरी योग्य ती खबरदारी घेतली जात आहे. तर आतापर्यंत 680 हून अधिक लोकांना आपला जीव गमवावा लागला असून चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.

कोरोनाचा सामना करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशभरात 3 मे पर्यंत ‘लॉकडाऊन’ लागू करण्यात येत असल्याची घोषणा केली आहे. तसेच घरामध्ये राहण्याचे आवाहन केले आहे.

कोरोनाशी लढण्यासाठी वैद्यकिय क्षेत्रातील कर्मचारी आणि पोलीस देखील अहोरात्र काम करत आहेत. तसेच वेळप्रसंगी काही स्वत:चा जीव धोक्यात घालून सर्वसामान्यांची मदत करत आहेत.

रुग्णांची सेवा करण्यासाठी अनेक डॉक्टर आपल्या कुटुंबापासून दूर राहत आहेत. अशाच एका डॉक्टर दाम्पत्याची प्रेरणादायी घटना समोर आली आहे. लग्नाच्या वाढदिवशी या दाम्पत्याने रुग्णांची सेवा केली आहे.

रांचीतील राजेंद्र इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेसचमध्ये एका डॉक्टर दाम्पत्याने रुग्णालयातच लग्नाचा वाढदिवस साजरा केला आहे.

निशांत पाठक आणि रितिका असं या दोघांचं नाव असून डॉक्टर दाम्पत्याने रुग्णालयातील स्टाफ आणि रुग्णांच्यासोबत लग्नाचा वाढदिवस साजरा केला.

16 एप्रिलला दाम्पत्याच्या लग्नाचा दुसरा वाढदिवस होता. डॉक्टर निशांतने ट्विटरवर काही फोटो शेअर करत याची माहिती दिली होती.

16 एप्रिलला आमचा लग्नाचा वाढदिवस होता पण या दिवशी केक किंवा मित्रमैत्रिणीसोबत नव्हते. आम्ही तीन सहकारी आणि चार नर्ससोबत कोरोना वॉर्डमध्ये होतो असं निशांत यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे.

रुग्णांच्या चेहऱ्यांवर असलेलं हसू आमच्यासाठी लग्नाच्या वाढदिवसाचं गिफ्ट होतं. आम्हाला आशा आहे की ते कोरोनाविरुद्धची लढाई जिंकतील आणि हेच आमच्यासाठी खरं गिफ्ट असेल असं देखील डॉक्टर दाम्पत्याने म्हटलं आहे.

रिम्समधील कोरोना सेंटरमध्ये निशांत आणि रितिका यांची 15 ते 22 एप्रिल या कालावधीत ड्युटी होती. त्यानंतर दोघांनाही एका हॉटेलमध्ये 14 दिवस क्वारंटाईन करण्यात आलं आहे.

झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन आणि आरोग्यमंत्री बन्ना गुप्ता यांनीही डॉक्टर दाम्पत्याला लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.