Coronavirus: भारत माता की जय... गो कोरोना गो, देशभरात 'दिपोत्सवा'चा जय हो

By ऑनलाइन लोकमत | Published: April 5, 2020 09:52 PM2020-04-05T21:52:45+5:302020-04-05T22:06:45+5:30

indian celebrate sunday night with appeal of PM narendra modi with lightning of lamp in house and window fro fight against corona

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या आवाहनाला देशभरातून प्रतिसाद मिळाला, नागरिकांनी घराच्या दारात आणि खिडकीत दिवे लावून कोरोनाविरुद्ध लढ्यात एकतेचा संदेश दिला

आपल्या गॅलरीत उभे राहून दिवा लावताना, देशप्रेमाची भावनाही नागरिकांच्या मनात दिसली, अनेक ठिकाणी तिरंगा फडकताना दिसला

काहींनी पणती लावली, काहींनी कणकीचे दिवे उजळवले, अनेकांनी लाईट्स दिवे लावले तर काहींनी मोबाईलच्या बॅटरीची टॉर्ज लावली

विजयी विश्व तिरंगा प्यारा, झेंडा उँचा रहे हमारा.... गो कोरोना गो...

दारात, घरात, खिडकीत अन् गॅलरीत सुद्धा... कोरोना विरुद्धच्या लढाईत भारतीय एकरुप झाल्याचं पाहायला मिळालं

काहींनी तिरंग्याची रांगोळी काढून, काहींनी तिरंगा ध्वज फडकावून वंदे मातरमचा नारा दिला

श्री दत्त नृसिंहवाडी येथे अशारितीने दिवे उजळले होते, मंदिर परिसर दिव्यांनी प्रकाशमान झाला होताअभि

अभिनेता सिद्धार्थ जाधवनेही मोबाईलच्या बॅटरीचा प्रकाश पाडून पंतप्रधानांच्या आवाहनाला प्रतिसाद दिला

महानगरांमधील नागरिकांनीही ९ मिनिटे घरातील लाईट्स बंद करुन दिवे लावून एकतेचा संदेश दिला

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी विजेचे दिवे बंद करुन समई पेटवत, कोरोनाविरुद्धच्या लढाईत आपण अग्रभागी असल्याचं सांगितलं.

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी समई पेटवून एकतेचा संदेश दिलाअनेक

अनेकांनी मेणबत्ती पेटवून.. जलो मगर दिप जैसे... दिव्याप्रमाणे तेवत राहू अन् कोरोनाचा अंधकार दूर करू, असा संदेश दिला

मोदींच्या चाहत्यांनी मोदींच्या नावानेच हर हर मोदी.. अशी दिव्यांची आरास केली होती

रांगोळी काढून दिवे लावून, अनेकांनी कोरोनाविरुद्धच्या लढाईत गो कोरोना गो... चा नारा दिला