Coronavirus: ISRO ची जबरदस्त कामगिरी, कोरोना रुग्णांना मिळणार ‘प्राण’; ३ व्हेंटिलेटरचं वैशिष्टं काय? जाणून घ्या

By ऑनलाइन लोकमत | Published: June 8, 2021 10:28 AM2021-06-08T10:28:30+5:302021-06-08T10:32:56+5:30

ISRO developed three types of ventilators: तंत्रज्ञानाच्या मदतीनं भारतीय अंतराळ संशोधन संस्था(ISRO)नं ३ वेगवेगळ्या प्रकारच्या व्हेंटिलेटरची निर्मिती केली आहे. ज्याचा कोरोना रुग्णांवरील उपचारासाठी प्रचंड फायदा होणार आहे.

भारतीय अंतराळ संशोधन संस्था(ISRO)ने कोरोना रुग्णांच्या उपचारासाठी मोठं पाऊल उचललं आहे. इस्त्रोने तीन वेगवेगळ्या प्रकारचे व्हेंटिलेटर्स बनवले आहेत. आता व्हेंटिलेटर्सचे हे तंत्रज्ञान उत्पादन करण्यासाठी इस्त्रोने परवानगी दिली आहे जेणेकरून याचा वैद्यकीय वापरासाठी वापर केला जाऊ शकतो.

जर हे व्हेंटिलेटर्स बाजारात आले तर कोरोना रुग्णांवर उपचारासाठी मोठा फायदा होणार आहे. अलीकडेच देशात कोविडमुळे हजारो लोकांचा मृत्यू झाला आहे. अनेकदा व्हेंटिलेटर्सचा अभाव असल्याने रुग्णांनी जीव तोडल्याचा घटना ऐकायला मिळाल्या आहेत.

कमी किंमत आणि पोर्टेबल क्रिटिकल केअर व्हेंटिलेटर्सला प्राण हे नाव देण्यात आलं आहे. हे व्हेंटिलेटर्स एमबीयू(आर्टिफिशियल मॅन्युल ब्रीदिंग यूनिट) बॅग आहे. त्यात एक हायटेक कंट्रोल सिस्टम लावण्यात आलेली असते. त्याचसोबत एअरवे प्रेशर सेंसर, फ्लो सेंसर, ऑक्सिजन सेंसर, सर्वो एक्चुएटर, पीईईपी कंट्रोल वॉल्व लावण्यात आले आहेत.

या व्हेंटिलेटरमध्ये एक टच स्क्रीन पॅनल आहे. ज्यात व्हेंटिलेशन मोड पर्याय निवडला जाऊ शकतो. डिसप्लेवर प्रेशर, फ्लो, टाइडल वॉल्यूम आणि ऑक्सिजन कॉन्सेन्ट्रेशन याची पूर्ण माहिती मिळते. हा डिस्पले टच स्क्रीनवर लावलेला असतो.

या व्हेंटिलेटलच्या मदतीनं रुग्णांच्या फुस्फुस्सात ऑक्सिजन आणि हवेच्या मिक्सचरला पाठवला जाऊ शकतो. रुग्णाला जितकी गरज असेल तितकीच हवा देता येते. ज्या रेटवर रुग्णाला हवा द्यायला हवी ते डॉक्टर ठरवतील. जर यावेळी लाईट गेली तरीही व्हेंटिलेटर्स काम करेल कारण त्यात बॅकअपसाठी बॅटरी देण्यात आली आहे.

प्राण व्हेंटिलेटर्सला इनवैसिव आणि नॉन इनवैसिक दोन्ही मोडवर चालवता येते. रुग्णाला किती हवेची गरज आहे ते व्हेंटिलेटरमध्ये सेट केले जाऊ शकतं. यात हीदेखील सुविधा आहे की, ज्या प्रमाणात रुग्ण श्वास घेत आहे त्याच प्रमाणात व्हेंटिलेटर सेंटिग निश्चित ठेवले जाऊ शकते.

इतकचं नाही तर रुग्णांच्या सुरक्षेसाठी प्राण व्हेंटिलेटरमध्ये अलार्म लावण्यात आला आहे. रुग्णाच्या कोणत्याही गंभीर स्थितीत ते डॉक्टरांना अलर्ट करण्याचं काम करतं. व्हेंटिलेशनवेळी बॅरोट्रॉमा, एसफिक्सिया, ऐपनियासारखा धोका उद्भवल्यास अलार्म संकेत देते. जर व्हेंटिलेटरमध्ये चुकीचं कनेक्शन लावलं असलं तरी ते अलार्म वाजवतं.

त्याचसोबत व्हेंटिलेशन वापरावेळी रुग्णांना बॅक्टेरिया इन्फेक्शन होऊ नये, हवेतील कोणत्याही प्रकारचं प्रदुषण होऊ नये, त्यातून बचावासाठी बॅक्टेरियल वायरल फिल्टर्सची सुविधाही व्हेंटिलेटरमध्ये देण्यात आली आहे. इस्त्रोने अशाप्रकारे आणखी एक व्हेंटिलेटरचं उत्पादन केले आहे.

कोणत्या रुग्णाला श्वास घेण्यास अडचण असेल तर ते व्हेंटिलेटर मदत करतं. हे व्हेंटिलेटर सेंट्रिफ्यूगल ब्लोअर तंत्रज्ञानावर आधारित आहे. जी आसपासची हवा शोषून घेतं त्याला कंम्प्रेस करतं आणि रुग्णाच्या फुस्फुस्सापर्यंत पाठवतं. हवा घेण्यासाठी रुग्णाला अतिरिक्त शक्ती लावण्याची गरज भासत नाही.

या व्हेंटिलेटरला हायप्रेशर ऑक्सिजन सोर्सशी जोडता येऊ शकतं. रुग्णाला किती ऑक्सिजन हवा हे स्वत:हून नियंत्रित होईल. या व्हेंटिलेटरमध्ये ह्यूमन मशीन इंटरफेस लावण्यात आलं आहे. जे मेडिकल ग्रेड टच स्क्रीनशी जोडलं आहे. त्यामुळे ऑपरेटर रियल टाइम व्हेंटिलेटर सेट करणं आणि पॅरामीटर्सवर लक्ष देऊ शकतं.

या व्हेंटिलेटरमध्ये पॉवर सप्लाई यूनिट लावण्यात आली आहे. जे २३० वॉल्टच्या करंटने चालतं. जर वीज गेली असेल तर बॅटरी बॅकअपच्या माध्यमातून सुरू राहतं. जर व्हेंटिलेटरमध्ये काही समस्या झाली तर अलार्म वाजवला जातो. व्हेंटिलेटरमध्ये एचएमआय सिस्टम लावली आहे ज्यामुळे काही गडबड झाली तर त्याचे संकेत दिले जातात.

त्याचसोबत तिसरा व्हेंटिलेटर बनण्यात आला असून तो स्वस्तात आहे. जो गॅसवर चालतो. आपत्कालीन वापरासाठी त्याचा वापर केला जाऊ शकतो. रुग्णवाहिकेत हे फिट केले जाऊ शकते. रुग्णांवर प्राथमिक उपचार केले जाऊ शकतात. या सर्व व्हेंटिलेटरचं डिझाईन साधं आहे. त्याचसोबत या व्हेंटिलेटरमध्ये मॅन्युल सेटिंगही देण्यात आली आहे.

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!