शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Corona : दिल्लीतील स्मशानात वेटींग, लाकडंही संपली, फोटो व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Published: April 23, 2021 7:17 PM

1 / 10
देशभरात कोरोना विषाणूच्या संसर्गाच्या दरम्यान वेदनादायी आणि भयानक चित्र समोर येत आहे. बर्‍याच मन हेलावून टाकत असलेल्या घटना सोशल मीडियात दिसत आहेत.
2 / 10
स्मशानभूमीत जळलेली प्रेतं, रुग्णालयात ऑक्सिजनची कमतरता आणि बहुतेक अहवालांमध्ये लोकांच्या असहायतेची स्थिती सांगितले जाते. अनेक स्मशानभूमीत विदारक चित्र आहे.
3 / 10
राजधानी दिल्लीतील गीता कॉलनी येथे शुक्रवारी दुपारीच प्रेतं जाळण्यासाठी लांबलचक रांग पाहायला मिळाली. येथील स्मशानभूमीत 29 प्रेते जाळली जाऊ शकतात.
4 / 10
कोरोना कालावधीत येथील स्मशानभूमीत येणाऱ्यां पार्थीव शरीरांचा आकडा मोठा असून जागेच्या मर्यादेपेक्षा दुप्पट प्रेतं जाळण्यासाठी येत आहेत.
5 / 10
केवळ जेवढी प्रेते स्मशानभूमीत आहेत, तितक्याच प्रेतांना जाळण्याएवढी लाकडं शिल्लक आहेत, असे येथील स्मशानभूमीचे केअरटेकर संजय कुमार यांनी सांगितलं.
6 / 10
स्मशानाबाहेरी प्रेतांना आता वापस पाठविण्यात येत असून स्मशानभूमीच्या गेटला कुलूप लावण्यात आल्याचं विदारक आणि अंगावर शहारे आणणारं येथील चित्र आहे.
7 / 10
दरम्यान, दिल्लीतील मोठ्या क्रिमेशन ग्राऊंडसह निगमबोध घाट, लोधी कॉलोनी गाजीपूर येथील स्मशानात कोविड रुग्णांवर अंत्यसंस्कार होत आहे.
8 / 10
त्यामुळे, नॉन कोविड स्मशानभूमीत प्रेतांना जाळण्यासाठी गर्दी होत असल्याचं दिसून येत आहे. कालपासून दिल्लीतील एका स्मशानभूमीचे फोटो व्हायरल होत आहे.
9 / 10
रियुटरचे फोटोग्राफर दानिश सिद्दिकी यांनी दिल्लीतील स्मशानभूमीचे एरियल व्हूव चे फोटो घेतले आहेत, ते फोटो ट्विटरवर आणि सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
10 / 10
रियुटरचे फोटोग्राफर दानिश सिद्दिकी यांनी दिल्लीतील स्मशानभूमीचे एरियल व्हूव चे फोटो घेतले आहेत, ते फोटो ट्विटरवर आणि सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
टॅग्स :delhiदिल्लीcorona virusकोरोना वायरस बातम्याDeathमृत्यूhospitalहॉस्पिटल