Corona Virus : कोविडच्या भीषण लाटेत कोरोनाने नव्हे तर 'या' बॅक्टेरियामुळे लोकांना गमवावा लागला जीव

By ऑनलाइन लोकमत | Published: May 13, 2023 11:40 AM2023-05-13T11:40:29+5:302023-05-13T11:59:12+5:30

Corona Virus : कोरोनाबाबत अनेक ठिकाणी रिसर्च करण्यात येत असून नवनवीन माहिती समोर येत आहे.

वेगाने पसरणाऱ्या कोरोनामुळे लोकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. जगभरात कोरोनाचा कहर पाहायला मिळत आहे. अनेक प्रगत देश कोरोनाच्या महाभयंकर संकटाचा सामना करत आहेत. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करण्यात येत आहेत.

कोरोनाबाबत अनेक ठिकाणी रिसर्च करण्यात येत असून नवनवीन माहिती समोर येत आहे. भारतासह जगातील अनेक देशांमध्ये कोरोनाचा प्रभाव अजूनही दिसून येत आहे. प्रकरणांमध्ये वाढ होताना दिसत आहे. संशोधक अजूनही SARS-CoV-2 चा शरीरावर कसा परिणाम होतो याचा अभ्यास करत आहेत.

सध्या, एका नवीन विश्लेषणातून समोर आले आहे की, कोविड-19 संसर्गादरम्यान जे लोक व्हेंटिलेटरवर होते त्यांना सेकेंडरी बॅक्टेरियाचा संसर्ग झाला असावा ज्यामुळे त्यांचा मृत्यू होऊ शकतो. कोरोनाबाबत जगभरात खबरदारीचे उपाय केले जात आहेत.

विशेष म्हणजे, त्या काळात, कोरोना व्हायरसची लागण झालेल्या लोकांमध्ये फुफ्फुसातील सेकेंडरी बॅक्टेरियाचा संसर्ग (न्यूमोनिया) सामान्य होता, या लोकांना व्हेंटिलेटरची आवश्यकता होती. संशोधकांनी सेकेंडरी बॅक्टेरियाचा न्यूमोनिया शोधण्यासाठी मशीन लर्निंगचा वापर केला.

आर्टिफिशियल इंटेलिजेंसचा हा एक प्रकार आहे. याबद्दल, नॉर्थवेस्टर्न युनिव्हर्सिटी फिनबर्ग स्कूल ऑफ मेडिसिनच्या टीमने जर्नल ऑफ क्लिनिकल इन्व्हेस्टिगेशनमध्ये निष्कर्ष प्रकाशित केले आहेत.

"गंभीर न्यूमोनिया असलेल्या रूग्णांच्या मृत्यूमध्ये व्हेंटिलेटर-संबंधित न्यूमोनिया (व्हीएपी) च्या अयशस्वी उपचारांचे योगदान निश्चित करण्याचे आमचे उद्दिष्ट आहे," असे तपासात म्हटले आहे. यासोबतच डॉक्टरांना असेही आढळून आले आहे की कोविड-19 मध्ये साइटोकिन स्टॉर्म मृत्यूचे कारण मानले जात आहे, परंतु तसे नाही.

साइटोकिन स्टॉर्म म्हणजे जास्त जळजळ ज्यामुळे फुफ्फुसे, मूत्रपिंड आणि मेंदूवर परिणाम करणारे अवयव निकामी होतात. कोरोनाच्या संकटात लाखो लोकांचा मृत्यू झाला. तर कोट्यवधी लोकांनी लस घेतली आहे.

वरिष्ठ लेखक बेंजामिन सिंगर यांनी एका निवेदनात म्हटले आहे की, “आमचे संशोधन कोविड-19 सह गंभीर न्यूमोनिया असलेल्या रूग्णांमध्ये सेकेंडरी बॅक्टेरिया न्यूमोनिया रोखणे, शोधणे आणि उपचार करण्याचे महत्त्व अधोरेखित करते.

संशोधन पथकाने नॉर्थवेस्ट मेमोरियल हॉस्पिटलच्या आयसीयूमध्ये ठेवण्यात आलेल्या 585 रुग्णांचे विश्लेषण केले. या रुग्णांना गंभीर न्यूमोनिया आणि श्वास घेण्यास गंभीर त्रास होत होता. यापैकी 190 रुग्णांची कोविड चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. टीमने कार्पेडियम नावाचा नवीन मशीन लर्निंग दृष्टिकोन विकसित केला.

बेंजामिन सिंगर म्हणाले, “जे लोक सेकेंडरी न्यूमोनियापासून बरे झाले आहेत ते जगण्याची शक्यता जास्त आहे, परंतु ज्यांच्या न्यूमोनियाचे निराकरण झाले नाही त्यांचा मृत्यू होण्याची शक्यता जास्त आहे. आमच्या डेटाने असे सुचवले आहे की व्हायरसशी संबंधित मृत्यू दर तुलनेने कमी आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.