CoronaVirus Live Updates : कोरोनाचा प्रकोप! दक्षिण कोरियात 3 दिवसांत 11 लाख रुग्ण, चीनमध्ये परिस्थिती गंभीर तर भारतात...

By ऑनलाइन लोकमत | Published: March 21, 2022 03:09 PM2022-03-21T15:09:43+5:302022-03-21T15:27:27+5:30

CoronaVirus Marathi News and Live Updates: प्रगत देश कोरोनाच्या महाभयंकर संकटापुढे हतबल झाले आहेत.

जगभरात पुन्हा एकदा कोरोनाचा प्रकोप पाहायला मिळत आहे. वेगाने कोरोना रुग्णांच्या आणि मृतांच्या संख्येत वाढ होत आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले जात आहेत.

गेल्या 24 तासांत जगभरात कोरोनाचे तब्बल 11 लाखांहून अधिक नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर 2917 जणांचा मृत्यू झाला आहे. अनेक प्रगत देश कोरोनाच्या महाभयंकर संकटापुढे हतबल झाले आहेत.

दक्षिण कोरियामध्ये कोरोनाने थैमान घातले आहे. गेल्या 24 तासांत 3.34 लाख रुग्ण आढळले आहेत तर मागील तीन दिवसांत 11 लाखांहून अधिक केसेस सापडल्या आहेत. चीनमध्ये देखील कोरोनामुळे गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे.

चीनने पुन्हा एकदा जगाचं टेन्शन वाढवलं आहे. अनेक ठिकाणी लॉकडाऊन करण्यात आलं आहे. कोट्यवधी लोक घरामध्ये बंद आहेत. तसेच कडक निर्बंध देखील अनेक शहरामध्ये लागू करण्यात आले आहेत.

जगभरात कोरोनाचा कहर पाहायला मिळत असताना भारतात कोरोनाची नवी लाट येणार का? भारताला नव्या व्हेरिएंटचा कितपत धोका असे अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. त्याबाबत आता तज्ज्ञांनी महत्त्वाची माहिती दिली आहे.

तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार, भारतात भविष्यात येणाऱ्या कोरोना लाटेच्या गंभीर परिणामाची शक्यता कमी आहे. मास्क, सोशल डिस्टंसिंग, होम क्वारंटाईच्या माध्यमातून काळजी घेतली जात आहे.

भारतात वेगाने होणारं कोरोना लसीकरण आणि नॅचरल इम्युनिटी यामुळे येणाऱ्या काळात कोरोनाचा प्रभाव पाहायला मिळणार नाही. कोरोना मृतांच्या आणि नव्या रुग्णांचा आकडा कमी होणार असल्याचं देखील काहींनी म्हटलं आहे.

देशात गेल्या 24 तासांत कोरोनाचे 1,549 नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर 31 जणांचा मृत्यू झाला आहे. कोरोनामुळे आतापर्यंत देशभरात तब्बल पाच लाखांहून अधिक लोकांना जीव गमवावा लागला आहे.

कोरोनाची दुसरी लाट अत्यंत धोकादायक ठरली होती. त्यामुळे लोकांनी हलगर्जीपणा करून नये. नियमांचं पालक करावं अन्यथा निष्काळजीपणा जीवावर बेतू शकतो असं देखील तज्ज्ञांनी म्हटलं आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.

IMA कोच्चीचे रिसर्च सेलचे हेड डॉ. राजीव जयदेवन यांच्या मते भारतात चीनपेक्षा जबरदस्त हायब्रिड इम्युनिटी आहे. मागच्या वर्षी दुसरी लाट आली होती. त्यानंतर लसीकरणाचा वेग वाढला. ज्यामुळे लोकांची इम्युनिटी वाढली. त्यामुळे भारतात कोरोनाचा संसर्ग कमी आहे.

कोविड टास्क फोर्स NTAGI चे प्रमुख डॉ. नरेंद्र कुमार अरोडा यांनी भारतात BA.2 चे रुग्ण वाढण्याची शक्य़ता कमी आहे. पण जर नवा व्हेरिएंट आला तर रुग्णांची संख्या वाढू शकते. 22 जूनपर्यंत कोरोनाची चौथी लाट येण्याची शक्यता वर्तवली गेली आहे असं म्हटलं आहे.

डॉ. जयदेवन यांनी चीनसह अनेक देशांमध्ये कोरोनाचा संसर्ग वाढत असला तरी भारतात संसर्ग वाढण्याची शक्यता कमी आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले जात आहेत.

कोरोना व्हायरसचं नवीन म्यूटेशन विध्वंस आणू शकतो. हा नवीन प्रकार डेल्टा आणि ओमायक्रॉनपासून बनलेला आहे. डब्ल्यूएचओने म्हटलं आहे की हे नवीन कॉम्बिनेशन व्हायरसबद्दल आधीच भीती होती कारण ते दोन्ही खूप वेगाने पसरत आहेत.

WHO मध्ये कोरोना टेक्निकल टीमचे नेतृत्व करणाऱ्या मारिया वॅन कर्खोव यांनी एका ट्विटमध्ये म्हटलं आहे की हे अपेक्षित होतं, विशेषत: हे दोन्ही प्रकार खूप वेगाने पसरत आहेत. WHO या प्रकरणावर लक्ष ठेवून आहे आणि या संदर्भात अभ्यास सुरू आहे.