शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Corona Vaccine : 100 टक्के लसीकरण करणाऱ्या गावांना मिळणार तब्बल 10 लाख; 'या' राज्याच्या मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा

By ऑनलाइन लोकमत | Published: May 18, 2021 10:00 PM

1 / 14
देशात कोरोनाचा कहर पाहायला मिळत आहे. रुग्णांच्या संख्येने तब्बल दोन कोटींचा टप्पा पार केला आहे. कोरोनामुळे आतापर्यंत तब्बल दोन लाखांहून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी योग्य ती खबरदारी घेतली जात आहे.
2 / 14
देशातील कोरोनाग्रस्तांची संख्या 2,52,28,996 वर पोहोचली आहे. देशात गेल्या 24 तासांत कोरोनाचे 2,63,533 नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर 4,329 जणांचा मृत्यू झाला आहे. कोरोनामुळे आतापर्यंत देशभरात तब्बल 2,78,719 लोकांना जीव गमवावा लागला आहे.
3 / 14
कोरोनाला रोखण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न केले जात आहेत. लसीकरण देखील सुरू असून आतापर्यंत लाखो लोकांनी कोरोनाची लस घेतली आहे. अनेक सरकारांनी लसीकरणावर भर दिल्याचं पाहायला मिळत आहे.
4 / 14
लसीकरणासंदर्भात आता एका राज्याने मोठा निर्णय घेतला आहे. नागरिकांनी लस घ्यावी यासाठी सरकारकडून सातत्याने आवाहन केलं जात आहे. पंजाब सरकारने एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.
5 / 14
पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी 100 टक्के लसीकरण करणाऱ्या गावांना 10 लाख रुपये बक्षीस देण्याची घोषणा केली आहे. त्याचबरोबर कोरोना लसीची भीती दूर करण्यासाठी आणि गावांना प्रोत्साहित करण्यासाठी सरकारने कोरोना मुक्त पिंड अभियानही सुरू केलं आहे.
6 / 14
मुख्यमंत्र्यांनी राज्यभरातील सरपंच आणि ग्रामपंचायत सदस्यांना कोरोना विरुद्धच्या लढाईत आपल्या गावात नेतृत्व करण्याचं आवाहन देखील केलं आहे. लोकांमध्ये कोरोनाची सर्वसाधारण लक्षणं दिसून आली तर कोरोना चाचणी आणि लसीकरणासाठी त्यांना प्रोत्साहित केलं जावं, असं आवाहन मुख्यमंत्र्यांनी केलं.
7 / 14
कोरोना उपचारासाठी सरकारने पंचायत फंडातून रोज 5 हजार ते अधिकाधिक 50 हजार रुपये वापरण्याचीही परवानगी दिली आहे. ग्रामीण भागातील जनतेला कोरोनाच्या दुष्परिणांबाबत जागृत करण्याची गरज आहे.
8 / 14
लोकांचे जीव वाचवण्यासाठी लक्षण दिसून आल्यास लवकरात लवकर कोरोना चाचणी आणि उपचार करण्याबाबत विशेष जनजागृती अभियानाची गरज असल्याचंही मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे.
9 / 14
ग्रामपंतायतींच्या अखत्यारित विशेष तपास शिबिरांचं आयोजन केलं जावं. त्यात माजी सैनिकांचाही समावेश केला जावा अशी सूचनाही अमरिंदर सिंग यांनी केली आहे. गावांमध्ये कोरोना रुग्ण येऊ नये यासाठी पहारा देण्याचा सल्ला देखील दिला आहे.
10 / 14
कोरोना रुग्णांची योग्य तपासणी करुन त्यांची ऑक्सिजन लेव्हल 94 टक्क्यांपेक्षा कमी असल्यास त्यांच्यावर योग्य उपचार केले जावेत असंही मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे. कोरोनामुळे भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
11 / 14
ग्रामीण भागात एखाद्या नागरिकाला कोरोनाची लक्षणं दिसून येत असतील तर त्याने स्वत: क्वारंटाईन झालं पाहिजे. कोणत्याही प्रकारचा निष्काळजीपणा पुढे गंभीर परिणाम घेऊन येऊ शकतो, असा इशाराही त्यांनी ग्रामीण भागातील जनतेला दिला आहे.
12 / 14
मुख्यमंत्री म्हणाले की, पंजाबमध्ये 2046 आरोग्य व कल्याण केंद्रांचे नेटवर्क आहे. लवकरच आणखी 800 सुरू होणार आहेत. त्यांनी सरपंच व पंचांना त्यांच्या गावातल्या केंद्रात संसर्ग झालेल्या लोकांवर उपचार करण्याचे सुनिश्चित केले आहे.
13 / 14
राज्य सरकार 18 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या लोकांच्या लसीकरणासाठी वेगवेगळ्या ठिकाणी पुरेशी कोरोना लस मिळावी यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत असल्याची माहिती देखील अमरिंदर सिंग यांनी दिली. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
14 / 14
देशात कोरोनाने थैमान घातले आहे. कोरोनासारख्या महाभयंकर संकटाचा सामना करण्यासाठी देश सज्ज झाला असून विविध उपाययोजना करण्यात येत आहेत. तसेच लोकांमध्ये लसीकरणाबाबत जागरुकता निर्माण करण्यात येत आहे.
टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCorona vaccineकोरोनाची लसPunjabपंजाब