काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधींनी घेतली गुजरातमधील व्यापा-यांची भेट
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 9, 2017 15:03 IST2017-11-09T14:56:31+5:302017-11-09T15:03:29+5:30

काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी आगामी गुजरात विधानसभा निवडणुकीसाठी चांगलीच कंबर कसली आहे. यावेळी राहुल गांधी अनोख्या पद्धतीनं निवडणुकीचा प्रचार करताना दिसत आहेत.
मंदिरांचे दर्शन घेऊन सामान्य जनतेशी संवाद साधत त्यांच्यासोबत थेट कनेक्ट होण्याचा प्रयत्न करताना राहुल गांधी यावेळी दिसत आहेत.
बुधवारी (8 नोव्हेंबर) राहुल गांधींनी सुरतमधील छोट्या व्यापा-यांची भेट घेऊन त्यांच्याशी संवाददेखील साधला, त्यांच्या समस्यादेखील जाणून घेतल्या.
नोटाबंदीच्या वर्षपूर्तीनिमित्त काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी सूरतमधील व्यापा-यांसोबत निदर्शनांमध्ये सहभागही नोंदवला