काँग्रेस अध्यक्ष बनल्यानंतर राहुल गांधी पहिल्यांदाच अमेठीत, टपरीवर घेतला चहाचा आस्वाद

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 15, 2018 14:56 IST2018-01-15T14:52:30+5:302018-01-15T14:56:17+5:30

काँग्रेस पार्टीच्या अध्यक्षपदाची सूत्र स्वीकारल्यानंतर राहुल गांधी सोमवारी (15 जानेवारी) पहिल्यांदाच अमेठीचा दौ-यावर होते.

अमेठीच्या दिशेनं प्रवास करत असताना राहुल गांधी यांनी टपरीवर चहाचा आस्वाद घेतला.

राहुल गांधी यांनी चहासोबत समोसांचाही आस्वाद घेतला.

उत्तर प्रदेश काँग्रेस अध्यक्ष राज बब्बरदेखील यावेळी त्यांच्यासोबत होते.

काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी अमेठीत येणार असल्यानं कार्यकर्त्यांनी जोरदार तयारीदेखील केली होती.