मतदान ओळखपत्रावरील फोटो बदलायचाय; घरबसल्या ऑनलाइन करा 'सबमिट'

By ऑनलाइन लोकमत | Published: December 13, 2023 03:23 PM2023-12-13T15:23:34+5:302023-12-13T15:31:22+5:30

भारतात आधार कार्ड हे ओळख प्रमाणपत्र मानले जात असले तरी आजही मतदान ओळखपत्र ही प्रत्येक भारतीयांची गरज आहे. देशाच्या नागरिकत्वाची ओळख, आणि मतदान करताना अत्यंत्य आवश्यक म्हणून ते ग्राह्य धरले जाते.

भारतात आधार कार्ड हे ओळख प्रमाणपत्र मानले जात असले तरी आजही मतदान ओळखपत्र ही प्रत्येक भारतीयांची गरज आहे. देशाच्या नागरिकत्वाची ओळख, आणि मतदान करताना अत्यंत्य आवश्यक म्हणून ते ग्राह्य धरले जाते.

वयाची १८ वर्षे पूर्ण केल्यानंतर तुम्हाला मतदार ओळखपत्र बनवणे आवश्यक आहे. मतदानासाठी आधार कार्ड असूनही मतदार ओळखपत्र असणे अत्यंत गरजेचे आहे. त्यामुळेच मतदार कार्ड देखील महत्त्वाचे दस्तऐवज मानले जाते.

जुन्या ओळखपत्रावर खराब फोटो आला होता, म्हणून जर तुम्हाला मतदार ओळखपत्रावरील तुमचा फोटो बदलायचा असेल तर तुम्ही तो घरी बसून ऑनलाईनही सहज बदलू शकता.

तुम्हाला सर्वप्रथम तुमच्या राज्य मतदार सेवेच्या अधिकृत वेबसाइटवर जाऊन Correction of entries in electoral roll (मतदार यादीतील नोंदी सुधारणे) हा पर्याय निवडावा लागेल. त्यासाठी, फॉर्म ८ निवडा आणि फॉर्म आपोआप उघडेल.

तुम्हाला राज्य, विधानसभा आणि तुम्ही ज्या मतदारसंघात आहात त्याचे नाव निवडण्यास सांगितले जाईल. फॉर्ममधील इतर सर्व माहिती भरा जसे तुमचे पूर्ण नाव, भाग क्रमांक, अनुक्रमांक आणि फोटो आयडी क्रमांक.

आता Photograph पर्यायावर क्लिक करा. तुम्हाला तुमचे नाव, पत्ता आणि मतदार ओळखपत्र क्रमांक भरण्यास सांगितले जाईल. तुमची जन्मतारीख, लिंग, आई आणि पतीचे नाव टाका.

त्यानंतर, तुमचा अलीकडचा पासपोर्ट आकाराचा फोटो अपलोड करा. एकदा तुम्ही फोटो अपलोड केल्यानंतर, तुम्हाला तुमचा ईमेल आयडी, फोन नंबर आणि स्थानाचे नाव प्रविष्ट करण्यास सांगितले जाईल.

तुम्ही ही विनंती सबमिट करत आहात त्या दिवसाची तारीख तिथे टाका. विनंती सबमिट केल्याची तारीख प्रविष्ट करा. तुम्हाला तुमच्या नोंदणीकृत मोबाईल नंबर आणि ईमेल आयडीवर एक पुष्टीकरण संदेश प्राप्त होईल.

केलेल्या दुरुस्त्या तुम्हाला पुढील मतदार यादीत किंवा ३० दिवसांनी दिसतील. दरम्यान, त्यासाठी तुम्हाला तुमचा फोन नंबर, ईमेल आयडी आणि लोकेशन टाकावे लागेल.