Brahmos Missile : पाकिस्तानला धडकी भरवणारी भारताची 'ब्रह्मोस मिसाईल'; किंमत ऐकून व्हाल हैराण!

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 13, 2025 13:48 IST2025-05-13T13:39:08+5:302025-05-13T13:48:42+5:30

Brahmos Missile : 'ऑपरेशन सिंदूर'मध्ये जवळपास १००हून अधिक दहशतवादी मारले गेले. या हल्ल्यात भारताने स्वतःचे बिल्ट इन सुपरसॉनिक क्षेपणास्त्र 'ब्रह्मोस' वापरले.

पहलगामच्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने 'ऑपरेशन सिंदूर' करून दहशतवाद्यांना चांगलाच धडा शिकवला. मात्र, त्यानंतर पाकिस्तानने भारतावर हल्ले करण्यास सुरुवात केली. भारतीय सैन्याने हे हल्लेही परतवून लावले.

चार दिवसांच्या संघर्षानंतर १० मे रोजी भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्धविराम जाहीर करण्यात आला. मात्र, त्याआधी भारतीय सैन्याने पाकमध्ये चांगलीच दाणादाण उडवली होती. हे काम भारतीय बनावटीच्या सुपरसॉनिक क्रूझ क्षेपणास्त्र 'ब्रह्मोस'ने केले.

'ऑपरेशन सिंदूर'मध्ये जवळपास १००हून अधिक दहशतवादी मारले गेले. या हल्ल्यात भारताने स्वतःचे बिल्ट इन सुपरसॉनिक क्षेपणास्त्र 'ब्रह्मोस' वापरले. या क्षेपणास्त्राने दहशतवाद्यांची तळं उद्ध्वस्त केली.

ब्रह्मोस या क्षेपणास्त्राचे नाव भारताच्या ब्रह्मपुत्रा नदी आणि रशियाच्या मोस्कवा नदीच्या नावावरून ठेवण्यात आले आहे. ब्रह्मोस क्षेपणास्त्र विकसित करण्यासाठी २५० दशलक्ष डॉलर्स खर्च झाले. आजच्या चलनात त्याचे मूल्य २,१३५ कोटी रुपये आहे. या प्रकल्पात भारताचा वाटा ५०.५% आणि रशियाचा वाटा ४९.५% होता.

मात्र, ब्रह्मोस क्षेपणास्त्राच्या अधिकृत किंमतीबद्दल कोणतीही माहिती समोर आलेली नाही. मीडिया रिपोर्ट्सनुसार, या क्षेपणास्त्राची किंमत सुमारे ३० कोटी रुपये आहे आणि त्याच्या उत्पादन युनिटची किंमत सुमारे ३०० कोटी रुपये आहे.

सुपरसॉनिक ब्रह्मोस क्षेपणास्त्राची मारा क्षमता २९० किलोमीटर आहे. तर, त्याच्या प्रगत आवृत्तीची रेंज ५०० ते ८०० किलोमीटर आहे. हे क्षेपणास्त्र २०० ते ३०० किलोग्रॅमपर्यंतचे उच्च स्फोटक वाहून नेऊ शकते. शत्रूचा नाश करण्यात या क्षेपणास्त्राची महत्त्वाची भूमिका बजावते.

ब्रह्मोसची ताकद पाहून, जगातील सुमारे १७ देशांनी ही मिसाईल खरेदी करण्याचा निर्णय घेतला आहे. विशेष म्हणजे चीनचा शत्रू देश फिलीपिन्सलाही ब्रह्मोस क्षेपणास्त्राची पहिली खेप मिळाली आहे.