भाजपचं मिशन 2024 : ब्ल्यू प्रिंट तयार, PM मोदींच्या 100 सभा होणार; जाणून घ्या कुठे-कुठे फोकस असणार?

By ऑनलाइन लोकमत | Published: March 8, 2023 04:42 PM2023-03-08T16:42:18+5:302023-03-08T16:49:42+5:30

हिंदी बेल्टवर भाजपची जबरदस्त पकड आहे. यामुळे आता भाजपने या तीन ठिकाणांवर आपले लक्ष केंद्रीत केले आहे.

मेघालय, त्रिपुरा, आणि नागालँड या तीन ईशान्येकडील राज्यांमध्ये भापने नुकचे सरकार स्थापन केले. यानंतर, आता भाजपने मिशन 2024 साठी कंबर कसली आहे. भाजपच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पक्षाने लोकसभा निवडणुकीत बम्पर विजय मिळविण्यासाठी ब्लू प्रिंट देखील तयार केली आहे.

हिंदी बेल्टवर भाजपची जबरदस्त पकड आहे. यामुळे आता भाजपने तीन ठिकाणांवर आपले लक्ष केंद्रीत केले आहे. ही तीन ठिकाणं म्हणजे, पश्चिम बंगाल, ओडिशा आणि दक्षिण भारतातील राज्ये.

भाजप याच वर्षापासून 2024 साठी संपूर्ण ताकद झोकून कामाला लागणार आहे. पक्षाचा सर्वात मोठा चेहरा असलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी या वर्षाच्या अखेरपर्यंत किमान 100 सभा घेणार आहेत. यात प. बंगाल, ओडिशा आणि दक्षिणेकडील राज्यांमधील मोठ्या प्रकल्पांच्या घोषणा, महिला आणि अल्पसंख्यकांपर्यंत पोहोचणे आदींचा समावेश आहे.

आगामी लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने ओडिशा, पश्चिम बंगाल आणि दक्षिण भारतातील 160 मतदारसंघांवर विशेष लक्ष केंद्रित करण्याचे भाजपचे लक्ष्य आहे.

इंडियन एक्सप्रेसच्या वृत्तानुसार, भाजपने 2024 मध्ये बम्पर विजयासाठी तीन ठिकाणांवर विशेष लक्ष केंद्रित केले आहे. यात दक्षिण भारतीय राज्ये, ओडिशा आणि पश्चिम बंगालचा समावेश आहे. या राज्यांत पीएम मोदी याच वर्षाच्या अखेरपर्यंत किमान 100 सभा करतील. यादरम्यान ते या राज्यांमध्ये मोठ्या प्रकल्पांची घोषणा करू शकतात.

याशिवाय, महिला आणि अल्पसंख्यकांवरही विशेष लक्ष असेल. महिला मोर्चाला महिलांपर्यंत पोहोच वाढविण्यावर विशेष लक्ष देण्यास सांगण्यात आले आहे. तसेच, अल्पसंख्यक मोर्चालाही 10 राज्ये आणि एका केंद्र शासित प्रदेशात जमिनिवर उतरून काम करण्याचा सल्ला देण्यात आला आहे. मोर्चाचा फोकस 60 लोकसभा मतदारसंघांवर राहील.

या राज्यांवर राहणार खास फोकस - 2024 साठी तामिळनाडू, आंध्रप्रदेश आणि केरळवर भाजपचे विशेष लक्ष असेल. याच वर्षात कर्नाटक विधानसभा निवडणूक होत आहे. या निवडणुकीत भाजप विजयासंदर्भात आश्वस्त आहे. तसेच, पश्चिम बंगाल आणि ओडिशा राज्यांत पक्ष एका खास रणनितीवर काम करेल, असे भाजपच्या सूत्रांनी म्हटले आहे.