शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

PHOTOS: शाही विवाह सोहळा! IAS 'परी' आणि भाजपा आमदार अडकले विवाहबंधनात

By ऑनलाइन लोकमत | Published: December 23, 2023 11:01 AM

1 / 11
हरयाणाच्या हिसार जिल्ह्यातील आदमपूर विधानसभा मतदारसंघातील भाजपा आमदार भव्य बिश्नोई आणि राजस्थानच्या IAS परी बिश्नोई यांचा शुक्रवारी उदयपूरमध्ये विवाह झाला.
2 / 11
राजस्थानातील उदयपूर आपल्या अनोख्या सौंदर्यासाठी जगभर ओळखले जाते. इथे विविध क्षेत्रातील दिग्गज मंडळी विवाह करतात. 'डेस्टिनेशन वेडिंग' म्हणून सर्वदूर ओळख असलेल्या उदयपूरमध्ये अनेक उद्योगपतींनी लग्न केले आहे.
3 / 11
हरयाणाच्या हिस्सार जिल्ह्यातील आदमपूर विधानसभा मतदारसंघातील भाजपा आमदार आणि हरयाणाचे माजी मुख्यमंत्री भजन लाल यांचे नातू भव्य बिश्नोई आणि राजस्थानच्या IAS परी बिश्नोई यांचा उदयपूरमध्ये विवाह झाला.
4 / 11
हा विवाह उदयपूरच्या उदयसागर तलावाच्या मध्यभागी असलेल्या एका बेटावर बांधलेल्या राफेल हॉटेलमध्ये झाला. जिथे आयएएस अधिकारी आणि आमदार यांनी सातफेरे घेतले.
5 / 11
या भव्य विवाह सोहळ्यासाठी दोन्ही कुटुंबातील पाहुण्यांनाच आमंत्रित करण्यात आले होते. याशिवाय नामांकित व्यक्तींची हजेरी होती. हॉटेलच्या बागेत हा विवाहसोहळा पार पडला.
6 / 11
नवरदेव भव्य यांनी पांढऱ्या रंगाची शेरवानी घातली होती. लग्नाच्या आधी गुरुवारी रात्री लग्नाच्याच ठिकाणी संगीतमय कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
7 / 11
लग्नानंतरचे पहिले रिसेप्शन २४ डिसेंबर रोजी अजमेर येथील पुष्कर इथे होणार आहे. त्यानंतर २६ डिसेंबरला भोजनाचा कार्यक्रम असून त्यात ५५ गावांतील लोकांना आमंत्रित करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. याशिवाय २७ डिसेंबर रोजी नवी दिल्लीत भव्य रिसेप्शन होणार आहे.
8 / 11
IAS परी बिश्नोई राजस्थानातील बिकानेर जिल्ह्यातील रहिवासी आहेत. २६ फेब्रुवारी १९९६ मध्ये जन्मलेल्या परी बिश्नोई यांनी २०२० मध्ये भारतीय प्रशासकीय सेवेची परीक्षा उत्तीर्ण करत IAS बनण्याचे स्वप्न पूर्ण केले.
9 / 11
भाजपा आमदार भव्य बिश्नोई यांचे आजोबा चौधरी भजनलाल यांनी दोन वेळा हरयाणाचे मुख्यमंत्रिपद सांभाळले होते. तसेच ते हरयाणामधून एकदा राज्यसभेवर आणि तीनवेळा लोकसभेवर निवडून गेले.
10 / 11
दरम्यान, आदमपूर येथे झालेल्या विधानसभा पोटनिवडणुकीत भव्य बिश्नोई यांनी भाजपाकडून निवडणूक लढवताना माजी केंद्रीय मंत्री जयप्रकार यांना पराभूत करून विजय मिळवला होता.
11 / 11
दरम्यान, आदमपूर येथे झालेल्या विधानसभा पोटनिवडणुकीत भव्य बिश्नोई यांनी भाजपाकडून निवडणूक लढवताना माजी केंद्रीय मंत्री जयप्रकार यांना पराभूत करून विजय मिळवला होता.
टॅग्स :Rajasthanराजस्थानHaryanaहरयाणाMLAआमदारmarriageलग्न