शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Bipin Rawat Helicopter Crash: ते चार प्रश्न, ज्यांचं उत्तर उलगडेल बिपिन रावत यांच्या हेलिकॉप्टरला झालेल्या अपघाताचं रहस्य

By ऑनलाइन लोकमत | Published: December 09, 2021 4:36 PM

1 / 6
तामिळनाडूमधील कुन्नूर येथे बुधवारी झालेल्य हेलिकॉप्टर अपघातामध्ये देशाचे चिफ ऑफ डिफेन्स स्टाफ जनरल बिपिन रावत यांचे निधन झाले होते. त्यांच्यासोबत त्यांची पत्नी मधुलिका रावत यांच्यासह अन्य १३ जणांचाही मृत्यू झाला. अपघात झाला तेव्हा जनरल रावत सर्वात सुरक्षित समजल्या जाणाऱ्या एमआय १७ व्ही ५ हेलिकॉप्टरमधून प्रवास करत होते.
2 / 6
या अपघातानंतर प्रत्येकाच्या मनात हाच प्रश्न निर्माण झालेला आहे की, हा अपघात कसा झाला. तसेच याचं कारण काय असावं? आता हवाईदलाने या अपघाताच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. यादरम्यान, चार मोठे प्रश्न समोर आले आहेत, ज्यांचं उत्तर तपास अधिकाऱ्यांना शोधायचं आहे. पाहूया कोणते आहेत हे चार प्रश्न.
3 / 6
एमआय-१७ व्ही५ हेलिकॉप्टर अपघातग्रस्त होऊन कोळण्यामागे तज्ज्ञांना जे कारण सर्वात मोठे वाटत आहे, ते हवामानच आहे. आधीही खराब हबामानामुळे असे अनेक अपघात झाले आहेत. एमआय-१७चे माजी पायलट अमिताभ रंजन यांनी आज तकला सांगितले की, अशा अपघातांमध्ये नेहमी हवामान हेच सर्वात मोठे कारण असते. विशेषकरून पर्वत आणि जंगलांनी वेढलेल्या परिसरामध्ये तर असेच होते. हा अपघात ज्या ठिकाणी झाला. तिथे सकाळी हवामान खराब होते.
4 / 6
अपघाताचे दुसरे कारण तांत्रिक बिघाड असू शकते. मात्र रशियात तयार करण्यात आलेल्या या अत्याधुनिक हेलिकॉप्टरला खूप सुरक्षित मानले जाते. त्यामुळे सीडीएससह सर्व व्हीव्हीआयपी एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाण्यासाठी याच हेलिकॉप्टरचा वापर करतात. पंतप्रधान नरेंद्र मोदीसुद्धा याच एमआय १७ व्ही-५ हेलिकॉप्टरमधून केदारनाथसह अन्य दुर्गम ठिकाणा पोहोचतात. हे डबल इंजिन असलेले हेलिकॉप्टर आहे. म्हणजेच प्रवासादरम्यान एक इंजिन खराब झाले तर हेलिकॉप्टर दुसऱ्या इंजिनच्या मदतीने प्रवास करू शकते.
5 / 6
जिथे ह्या हेलिकॉप्टरला अपघात झाला तिथून त्याचे उतरण्याचे ठिकाण वेलिंग्टन आर्म फोर्सेस कॉलेज केवळ १० किमी अंतरावर होते. अशा परिस्थितीत हे हेलिकॉप्टर कुठल्या तरी पॉवर लाईनला आदळून अपघातग्रस्त तर नाही झाले ना, असा प्रश्न निर्माण होत आहे. कारण सर्वसामान्यपणे हेलिपॅडच्या जवळ आल्यावर चॉपर आपली उंची कमी करतात. त्यामुळे त्यांना उतरणे सोपे जाते. अशा परिस्थितीत अपघात झाला तेव्हा हे हेलिकॉप्टर किती उंचीवरून उडत होते आणि कमी उंचीवरून जात असल्याने कुठल्या पॉवर लाईनला तर आदळले नाही ना, याचाही शोध घेणे गरजेचे आहे.
6 / 6
अनेक अपघातांचे कारण कुठलीही मानवी चूक म्हणजेच पायलटची चूक असू शकते. आता अपघाताच्या चौकशीमध्ये या प्रश्नाचेही उत्तर मिळून जाईल. मात्र तज्ज्ञांच्या मते या अपघातात पायलटची चूक असण्याची शक्यता फार कमी आहे. त्याचं कारण म्हणजे हे हेलिकॉप्टर जेवढं हायप्रोफाईल, एलिट आणि सुरक्षित आहे, तेवढेच ते चालवणारे पायलटसुद्धा तज्ज्ञ आहेत. त्यांना प्रत्येक प्रकारच्या परिस्थितीमध्ये उड्डाण करण्याचा अनुभव असतो. तसेच सीडीएस हे मोठे पद असल्याने त्यांच्या हेलिकॉप्टरच्या वैमानिकाकडे हे सर्व गुण असणे साहजिकच आहे.
टॅग्स :Bipin Rawatबिपीन रावतindian air forceभारतीय हवाई दलIndian Armyभारतीय जवानDefenceसंरक्षण विभाग