बांके बिहारी मंदिराच्या १०० वर्षांहून जुन्या 'तळघरात' अखेर काय सापडलं? साडे चार फूट सोन्याची काठी...

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 20, 2025 11:20 IST2025-10-20T11:09:27+5:302025-10-20T11:20:38+5:30

Banke Bihari Mandir Treasure: मथुरा येथील जगप्रसिद्ध बांके बिहारी मंदिराचे १०० वर्षांहून जुने तळघर उघडले. यात सोने-चांदीच्या छडीसह शेकडो प्राचीन भांडी आणि नाणी आढळली आहेत.

उत्तर प्रदेशातील मथुरेत असलेल्या जगप्रसिद्ध ठाकूर बांके बिहारी मंदिराचे अनेक शतके जुने तळघर अखेर १८ आणि १९ ऑक्टोबर २०२५ रोजी उघडण्यात आले.

तब्बल ५४ वर्षांपासून भाविकांना या तळघरात दडलेल्या 'खजिन्या'ची उत्सुकता होती आणि दोन दिवस चाललेल्या या प्रक्रियेनंतर त्यातील वस्तूंची यादी समोर आली आहे.

एडीएम आणि एसपी सिटीसह अनेक वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत तळघर उघडण्याचे काम करण्यात आले. बांके बिहारी महाराजांच्या तळघरातून सोने आणि चांदीच्या छडी, शेकडो प्राचीन भांडी आणि जुनी तांब्याची नाणी बाहेर काढण्यात आली.

दोन दिवसांच्या अथक शोध मोहिमेनंतर तळघरातून मिळालेल्या वस्तूंची यादी हाय पॉवर मॅनेजमेंट कमिटीच्या सदस्यांनी जाहीर केली आहे.

मंदिर उघडण्यात येणार असल्याने वेळ अपुरा होता. यामुळे शोधोमोहिम पुन्हा अर्धवट राहिली आणि तळघर पुन्हा सीलबंद करण्यात आले आहे.

सोने-चांदी: एक साडेचार फूट लांबीची सोन्याची छडी आणि तीन चांदीच्या छड्या सापडल्या आहेत.

भांडी: सुमारे २०० ते २५० च्या आसपास जुनी पितळेची आणि कांस्यची भांडी.

नाणी व इतर वस्तू: काही तांब्याची प्राचीन नाणी आणि काही दागिन्यांचे रिकामे बॉक्स सापडले आहेत.

पहिल्या दिवशी (१८ ऑक्टोबर) तळघरात धुळीशिवाय, माती आणि काही साप तसेच वाळवी आढळून आली होती, ज्यांना वन विभागाने सुरक्षित रेस्क्यू केले. त्यानंतर पुढे शोध घेतला असता तीन-चार मोठ्या पेट्या आढळल्या.

टॅग्स :मंदिरTemple