Ajit Kumar : वाघा बॉर्डरवर 'थाला'ची एंट्री, जवानांनी घेतला सेल्फी

By ऑनलाइन लोकमत | Published: October 19, 2021 09:54 PM2021-10-19T21:54:47+5:302021-10-19T22:32:55+5:30

Ajit Kumar : तमिळ सुपरस्टार अभिनेता अजित कुमार म्हणजे थालाने वाघा बॉर्डरवर भेट दिली. त्यावेळी हातात तिरंगा ध्वज घेतलेल्या थालाचे फोटो चांगलेच व्हायरल झाले आहेत.

वाघा बॉर्डरवर जाणे म्हणजे देशाभिमान व्यक्त करणे, देशाच्या सीमारेषेवर लढणाऱ्या जवानांना अभिवादन करणे होय.

भारत-पाकिस्तान सीमारेषेजवळ असल्याने वाघा बॉर्डर नेहमीच चर्चेत असते. त्यातच, एखाद्या सेलिब्रिटीने भेट दिल्यानंतर वाघा बॉर्डर आणि तेथील छायाचित्र व्हायरल होतात.

स्वातंत्र्य दिनादिवशी वाघा बॉर्डरवरील नजारा पाहण्याजोगा असतो, दोन्ही देशातील जवान ऐकमेकांप्रती आदर व्यक्त करतात, एकमेकांना शुभेच्छाही देत असतात.

येथील ध्वजारोहनाचा कार्यक्रम स्फूर्ती देणारा असतो. त्यामुळे, नागरिकांच्या गर्दीतील वाघा बॉर्डवरील ध्वजारोहन कार्यक्रमाचे व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत असतात.

आता, तमिळ सुपरस्टार अभिनेता अजित कुमार म्हणजे थालाने वाघा बॉर्डरवर भेट दिली. त्यावेळी हातात तिरंगा ध्वज घेतलेल्या थालाचे फोटो चांगलेच व्हायरल झाले आहेत.

थाला अजित कुमार यांच्यासमवेत जवानांनाही सेल्फी काढण्याचा मोह आवरता आला नाही. वाघा बॉर्डरवर थाला यांना पाहून उपस्थितांनी एकच जल्लोष केला होता.

वाघा बॉर्डरवर अनेकांनी अजित कुमार यांच्यासोबत सेल्फी घेतले असून ट्विटरवरुन हे फोटो शेअर करण्यात आले आहेत.

अजित कुमार हे प्रसिद्ध आणि लोकप्रिय अभिनेते आहेत, तमिळ चित्रपटातून त्यांनी आपल्या करिअरची सुरूवात केली होती.

रोमँटीक आणि एक्शन हिरो म्हणून ते सर्वपरिचीत आहेत, तसेच चाहत्यांनी त्यांना थाला ही उपाधीच दिलीय.