Agarwood: हिरा, सोन्या पेक्षाही कितीतरी पटीने महाग या 'चंदना'चे लाकूड; भारतातही सापडते

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 29, 2021 16:07 IST2021-09-29T16:02:59+5:302021-09-29T16:07:36+5:30

Agarwood is More Precious in World: दुर्मिळ आणि महागडे असल्याने या लाकडाची मोठ्या प्रमाणावर तस्करी केली जाते. चीन, हाँगकाँग, जपानमध्ये मोठ्या प्रमाणावर याची झाडे आहेत. भारतात केरळमध्ये या झाडाची शेती करण्याकडे कल वाढला आहे.

जगातील सर्वात महाग काय? असा प्रश्न जर तुम्ही कोणाला विचारला तर तुम्हाला सोने, चांदी फारफार तर हिरा असे उत्तर मिळेल. पण तुम्हाला लाकूड असे कोणी उत्तर दिले तर तुम्ही त्याला मूर्खात काढाल. पण खरेच या हिऱ्यापेक्षाही महाग हे लाकूड आहे आणि ते देखील भारतात उपलब्ध आहे.

एक्वीलेरीयाच्या झाडापासून हे लाकूड मिळते. त्याला जगभरात वेगवेगळ्या नावाने ओळखले जाते. अगरवुड, एलोववुड किंवा ईगलवुड असेही म्हटले जाते. हे लाकूड अरब, जपान, चीन आणि भारतामध्ये सापडते.

थांबा लगेच कुठे मिळते ते शोधायला जाऊ नका. अगरवुड हे लाकूड तसे दुर्मिळ आहे आणि महागडी वस्तू आहे. बिझनेस इनसायडरनुसार या एक किलो लाकडाची किंमत 1,00,000 डॉलर किंवा 73,00,000 रुपये असू शकते.

सध्या भारतात हिऱ्याची किंमत 3,25,000 रुपये आहे. तर १० ग्रॅम सोन्याची किंमत 47,695 रुपये आहे. जपानमध्ये या लाकडाला क्यारा किंवा क्यानम नावाने ओळखले जाते.

एगरवुड लाकडातून तेलही काढले जाते. हे लाकूड मुख्यत्वे सुगंधी द्रव्ये बनविण्यासाठी वापरले जाते. लाकूड सडल्यावर त्याचा वापर अत्तर बनविण्य़ासाठी केला जातो.

एगरवुडच्या सालीपासून तेलही काढले जाते. Oud Oil चा वापर परफ्यूम बनविण्यासाठी केला जातो. या तेलाची किंमत २५ लाख रुपये आहे. या लाकडाच्या किंमतीमुळे त्याला देवांचे लाकूड असेही म्हटले जाते.

दुर्मिळ आणि महागडे असल्याने या लाकडाची मोठ्या प्रमाणावर तस्करी केली जाते. चीन, हाँगकाँग, जपानमध्ये मोठ्या प्रमाणावर याची झाजे आहेत. बीबीसीनुसार तस्करी एवढ्या मोठ्या प्रमाणावर वाढली आहे की, ही झाडेच संपुष्टात येऊ लागली आहेत. Asian Plantation Capital Company ही आशियातील सर्वात मोठी एगरवुड प्रोसेसिंग कंपनी आहे.

टॅग्स :जंगलforest