शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

दिल्ली हिंसाचारानंतर, आता अशी आहे लाल किल्ल्याची स्थिती, पाहा Photos

By पूनम अपराज | Published: January 27, 2021 2:41 PM

1 / 7
जवळपास ५ हजाराहून अधिक शेतकरी मुकरबा चौक मार्गे बॅरिकेड तोडून लाल किल्ल्यावर पोहोचले. मंगळवारी झालेल्या हिंसाचारानंतर केंद्रीय पर्यटनमंत्री प्रल्हाद जोशी लाल किल्ल्यावर पोहोचले. ऐतिहासिक इमारतींचे झालेल्या नुकसानीचा आढावा घेण्यासाठी केंद्रीय मंत्री तेथे पोहोचले. केंद्रीय मंत्री यांच्या भेटीमुळे पर्यटकांची प्रवेश बंद झाली आहे.
2 / 7
दोन सीमांवरून आलेल्या आंदोलकांनी लाल किल्ल्यावर गोंधळ घातला. तिकिट काउंटरशिवाय त्यांनी प्रवेशद्वाराच्या गेटची तोडफोड केली. येथे कोट्यवधी रुपयांच्या एक्स-रे मशीनचे नुकसान झाले.
3 / 7
दोन सीमांवरून आलेल्या आंदोलकांनी लाल किल्ल्यावर गोंधळ घातला. तिकिट काउंटरशिवाय त्यांनी प्रवेशद्वाराच्या गेटची तोडफोड केली. येथे कोट्यवधी रुपयांच्या एक्स-रे मशीनचे नुकसान झाले.
4 / 7
ट्रॅक्टर रॅलीतून आलेल्या आंदोलकांनी लाल किल्ल्यात अशांतता निर्माण केली. त्यांनी पोलिसांच्या वाहनांचेही नुकसान केले. आंदोलकांनी लाल किल्ला परिसरातील पोलिसांची जिप्सी वाहन उलथून टाकल्या.
5 / 7
तसेच आंदोलकांनी तिकिट काउंटर व प्रवेशद्वारातील लावलेल्या काचांचे नुकसान केले. त्यानंतर काचेचे तुकडे येथे विखुरलेले होते.
6 / 7
सुरक्षा दलाने थोडं आंदोलकांना रोखण्याचा प्रयत्न केला, पण ते अपुरा ठरले. मात्र, त्यानंतर पोलिसांनी हे झेंडे लवकरच काढून टाकले. दरम्यान, खाली उभे असलेल्या आंदोलकांनी चिथावणीखोर घोषणाबाजी केली. आंदोलनकर्त्यांनी लाल किल्ल्याच्या आत घुसून तटबंदीपर्यंत पोहचणाऱ्या सर्व रस्त्यांवर कबजा केला. शेकडो आंदोलनकर्ते तटबंदीवर पोहोचले.
7 / 7
ट्रॅक्टर परेडमध्ये सामील झालेल्या आंदोलकर्त्यांनी तिकिट काउंटरची तोडफोड करून लाल किल्ल्यात प्रवेश करण्यासाठी गेटची तोडफोड केली. त्यांनी मेटल डिटेक्टर मशीनचे नुकसान केले. यानंतर अनेक आंदोलकांनी घुमटावर चढून तेथे झेंडे देखील ठेवले. संध्याकाळी पॅरामिलिटरी फोर्सच्या अतिरिक्त तुकड्या तैनात करण्यात आल्या.
टॅग्स :FarmerशेतकरीRed Fortलाल किल्लाPoliceपोलिस