शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

15 वर्षांनी राष्ट्रपतींचा रेल्वेप्रवास, 110 च्या वेगाने धावणार 'महाराजा एक्सप्रेस'

By ऑनलाइन लोकमत | Published: June 25, 2021 3:36 PM

1 / 11
देशाचे महामहिम राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी आज दिल्लीतील सफदरजंग रेल्वे स्थानकाहून कानपूरकडे प्रस्थान केले.
2 / 11
तब्बल १५ वर्षानंतर राष्ट्रपतीपदावरील व्यक्ती रेल्वेने प्रवास करत आहे. यापूर्वी २००६ मध्ये तत्कालीन राष्ट्रपती डॉ ए.पी.जे. अब्दुल कलाम यांनी रेल्वेने प्रवास केला होता.
3 / 11
भारतीय लष्कर अकादमीत (आयएमए) कॅडेट्सच्या पासिंग आउट परेडमध्ये भाग घेण्यासाठी दिल्ली ते देहरादून विशेष रेल्वेने प्रवास केला होता.
4 / 11
कानपूरमधील झिंझाक आणि कानपूर देहातच्या रुरा येथे ही ट्रेन दोन थांबे घेईल, जिथे राष्ट्रपती आपल्या शालेय जीवनाच्या दिवसांमधील जुन्या परिचितांची भेट घेतील.
5 / 11
राष्ट्रपतींचे जन्मस्थान असलेल्या कानपूर देहातच्या परौन्ख गावाजवळ हे दोन थांबे असून तेथे त्यांच्या सन्मानार्थ २७ जून रोजी दोन कार्यक्रम होणार आहेत.
6 / 11
राष्ट्रपतीपदाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर ते प्रथमच आपल्या जन्मस्थळी भेट देत आहेत. या ठिकाणी यापूर्वी भेट द्यायची त्यांची इच्छा होती, परंतु कोरोना महामारीमुळे ते शक्य झाले नाही.
7 / 11
२८ जून रोजी राष्ट्रपती कानपूर स्थानकातून रेल्वेगाडीतून लखनौला दोन दिवसांच्या दौऱ्यासाठी जातील. २९ जून रोजी ते विशेष विमानाने नवी दिल्लीला परतणार आहेत.
8 / 11
कोविंद यांनी निवडलेल्या रेल्वे मार्गाने प्रवासाची पद्धत ही अनेक राष्ट्रपतींच्या परंपरेनुसार आहे. ज्यांनी देशाच्या निरनिराळ्या भागातील लोकांशी संपर्क साधण्यासाठी रेल्वे प्रवास केला होता.
9 / 11
देशाचे पहिले राष्ट्रपती डॉ. राजेंद्र प्रसाद यांनी अनेकदा रेल्वे प्रवास केला होता. राष्ट्रपतीपदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर लगेचच त्यांनी बिहार दौऱ्यादरम्यान सिवान जिल्ह्यातील त्यांचे जन्मस्थान झिरादेई येथे भेट दिली होती.
10 / 11
छपरा येथून झिरादेईला जाण्यासाठी राष्ट्रपतींच्या विशेष रेल्वेगाडीत बसले आणि त्यांनी तिथे तीन दिवस वास्तव्य केले. त्यांनी रेल्वेने देशभर प्रवास केला.
11 / 11
डॉ. प्रसाद यांच्या नंतरच्या राष्ट्रपतींनी देखील देशातील लोकांशी संपर्क साधण्यासाठी रेल्वे प्रवासाला प्राधान्य दिले. आज रेल्वेमंत्री पियुष गोयल दिल्लीत राष्ट्रपतींच्या स्वागताला हजर होते.
टॅग्स :Presidentराष्ट्राध्यक्षRamnath Kovindरामनाथ कोविंदrailwayरेल्वेpiyush goyalपीयुष गोयल