शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Ashok Kharat Case : झुंबरची लाईट बंद म्हणजे...! अशोक खरातच्या केबिनमधील 'त्या' कोडवर्डचा धक्कादायक खुलासा; कर्मचाऱ्यांना अजब इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 27, 2026 17:27 IST

1 / 8
नाशिक स्वयंघोषित बाबा अशोक खरातच्या अटकेमुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. १८ मार्च रोजी एका ३५ वर्षीय महिलेने दाखल केलेल्या लैंगिक अत्याचाराच्या प्रकरणानंतर खरातविरोधात आतापर्यंत आठ एफआयआर दाखल करण्यात आले आहेत.
2 / 8
एसआयटीच्या तपासात दररोज नवीन धक्कादायक खुलासे होत आहेत. खरात आपल्या कार्यालयात सांकेतिक भाषेचा वापर करत होता असेही समोर आले आहे.
3 / 8
ज्यावेळी अशोक खरात एखाद्या महिलेला आपल्या केबिनमध्ये बोलावत होता त्यावेळी तो केबीनमधील झुंबराची लाईट बंद करत होता, असे तपासात उघड झाले आहे.
4 / 8
कर्मचाऱ्यांना केबीनमध्ये ज्यावेळी येऊ द्यायचे नसते त्यावेळी अशोक खरात झुंबराची लाईट बंद करत होता. झुंबराची लाईट हे कर्मचाऱ्यांसाठी कोडवर्ड होते. खरातया केबिनला काच बसवलेली होती, यातून बाहेरून आतील काही दिसत नव्हते. पण आतून बाहेरचे सगळे दिसत होते.
5 / 8
सरकारने आयपीएस अधिकारी तेजस्वी सातपुते यांच्या नेतृत्वाखाली एक विशेष तपास पथक स्थापन केले आहे. या पथकाने दोन मोबाईल क्रमांक जाहीर केले आहेत.
6 / 8
वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, गेल्या पाच दिवसांत खरातच्या गैरकृत्यांची तक्रार करणारे ५० हून अधिक फोन आले आहेत. तपास पथकाला दररोज सरासरी १५ ते २० फोन येत आहेत. तक्रारदारांची ओळख पूर्णपणे गोपनीय ठेवली जाईल, असे आश्वासन एसआयटीने दिले आहे.
7 / 8
जिल्हा प्रशासनाने अशोक खरात याचा रिव्हॉल्वर परवाना निलंबित केला आहे. खरात याने पीडितांना घाबरवण्यासाठी आपल्या शस्त्रांचा वापर केला असावा, असा प्रशासनाचा संशय आहे.
8 / 8
शुक्रवारी, एसआयटीने फॉरेन्सिक टीमसह खरात यांच्या कार्यालयातून फायली, कागदपत्रे आणि एक डायरी जप्त केली, यातून अनेक हाय-प्रोफाईल प्रकरणे उघडकीस येण्याची शक्यता आहे.
टॅग्स :Ashok Kharatअशोक खरातNashikनाशिकCrime Newsगुन्हेगारी