By ऑनलाइन लोकमत | Updated: March 24, 2026 13:00 IST
1 / 9Ashok Kharat Case : नाशिक येथील भोंदू अशोक खरात प्रकरणात दररोज नवीन माहिती समोर येत आहे. खरात याचा तपास आणखी वाढवला आहे, त्याच्याविरोधात आता तक्रारी देण्यासाठी महिला पुढे येत आहेत. या आधी फक्त तीनच गुन्हे दाखल होते, आता आणखी तीन गुन्हे दाखल झाले आहेत. 2 / 9काल नव्याने तीन तक्रारी झाल्या असून यामध्ये एका विद्यार्थीनीचा समावेश आहे.अशोक खरात याने एका विद्यार्थीनीवरही अत्याचार केल्याचे आता उघड झाले आहे. यामुळे आता संताप व्यक्त करण्यात येत आहे.3 / 9मिळालेल्या माहितीनुसार, अशोक खरात याने एका विद्यार्थीनीसोबतही गैरवर्तन केले आहे. या तक्रारीमुळे आता खरात याची चौकशी आणखी वाढवली आहे. खरात याची पोलिस कोठडी आज संपणार असून आज दुपारी त्याला न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.4 / 9आता पोलिसांनी अशोक खरात याच्या आर्थिक व्यवहारांची चौकशी सुरू केली आहे. नोंदीनुसार, ‘श्री शिवनिका संस्थान’च्या २०२० ते २०२२ दरम्यान संस्थानचे उत्पन्न फक्त ४.९० लाखांच्या आसपास होते, तर १.६० ते १.६४ लाख रुपयांची तूटही नोंदवली आहे.5 / 9पण, २०२४ नंतर संस्थानच्या उत्पन्नात अचानक झपाट्याने वाढ झाली. तब्बल ७६ लाख ९१ हजार ४१६ रुपयांचे उत्पन्न नोंदवले असून, खर्च वजा जाता ७०.६६ लाख रुपयांची शिल्लक राहिल्याचे दिसत आहे. तसेच संस्थानची मालमत्ता २०२२ मधील ९६ लाखांवरून २०२५ पर्यंत १ कोटी ८१ लाखांपर्यंत वाढली आहे. बँकेत २३ लाख ३५ हजार रुपयांच्या मुदत ठेवी असल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान, आता या प्रकरणाची चौकशी होणार आहे. 6 / 9अशोक खरात याच्या संस्थेला कोणी देणग्या दिल्या? एवढी रक्कम कशी मिळाली, या उत्पन्नाचे स्त्रोत काय आहे याची माहिती पोलिस घेणार आहेत.7 / 9अशोक खरात प्रकरणाने राज्यात खळबळ उडाली असून आता हे प्रकरण विधिमंडळातही चर्चेत आले आहे. काँग्रेस नेते विजय वड्डेटिवार यांनी या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी केली आहे, तर रुपाली चाकणकर यांचे प्रदेशाध्यक्षपदही काढून घेण्याची मागणी केली जात आहे.8 / 9राज्य महिला आयोगाच्या माजी अध्यक्ष रूपाली चाकणकर या खरातच्या ट्रस्टवर पदाधिकारी होत्या. त्यांनादेखील चौकशीसाठी बोलावले जाण्याची शक्यता सूत्रांनी वर्तवली आहे.9 / 9खरातविरोधात तक्रार करण्यासाठी ९५०३२७०२२४/ ७७७५८ १६३८९ या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन एसआयटी प्रमुख तेजस्वी सातपुते यांनी केले आहे.