मान्सूनपूर्वच्या तडाख्याने नांदेड जिल्ह्यात अतोनात नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 28, 2018 19:25 IST2018-05-28T19:25:12+5:302018-05-28T19:25:12+5:30

वादळी वा-यामुळे अर्धापूर तालुक्यातील केळीच्या बागा आडव्या झाल्या आहेत़

मालेगाव, देगाव कु़, उमरी, सावरगाव, कामठा या गावांतील जवळपास ४० च्या वर विद्युत खांब कोसळले तर अनेक खांबावर मोठमोठे वृक्ष उन्मळून पडले

रात्री साडेदहा वाजेच्या सुमारास सुरु झालेला पाऊस पहाटेपर्यंत बरसत होता़

नांदेड, लिंबगाव, अर्धापूर, बारड, बा-हाळी आदी परिसरात घरांवरील पत्रे उडून गेली होती़

अनेक घरांच्या भिंतीही पडल्या होत्या़ त्यामुळे अनेकांचे संसार उघड्यावर आले़

लिंबगाव, अर्धापूर परिसरातील आंबा, चिकू यासह इतर फळबागांनाही मोठा फटका बसला आहे़ शेतात आंब्याचा सडा पडला होता़