Nanded Murder Case : "तुझ्या बहिणीचं ज्याच्यासोबत लफडं त्याला मारुन ये....", सक्षमला मारण्याआधी पोलीस चौकीतील घटनाक्रम; आंचलने सांगितली धक्कादायक माहिती
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 1, 2025 13:39 IST
1 / 9बहिणीसोबत बोलत असल्याच्या कारणावरून झालेल्या वादातून गुरुवारी सायंकाळी एका तरुणाचा गोळी झाडून व डोक्यात फरशी घालून निर्घृण खून करण्यात आला. या प्रकरणी आता धक्कादायक खुलासे होत आहेत.2 / 9आमच्या प्रेमास विरोध करून वडील व भावांनी त्याला संपविले. असे असले तरी मी लग्न करून कायम त्याचीच राहील, असे म्हणत प्रेयसी आंचलने चक्क मृतदेहासोबत लग्न केले. प्रियकराला मारून कुटुंब हरले व त्याच्या मृतदेहासोबत लग्न करून मी जिंकल्याची भावना मुलीने व्यक्त केली.3 / 9प्रेम प्रकरणाची सुरुवात आणि सक्षमची हत्या याबाबत आंचलने माहिती दिली. सक्षम आणि माझे दोन्ही भाऊ चांगले मित्र होते. सक्षम आमच्या घरी नेहमी यायचा त्यातून तीन वर्षांपूर्वी आमचे प्रेम संबंध जुळले. तेव्हा सक्षम आणि आंचल दोघेही १६ ते १७ वर्षाचे होते. वर्षभरापूर्वी आंचलच्या कुटुंबीयांना प्रेम प्रकरणाची माहिती झाली.4 / 9आंचलने सांगितले की, वर्षभरापूर्वी वडील आणि भावांनी दबाव टाकला, धमक्या दिल्या सक्षम विरोधात गुन्हा दाखल कर, तक्रार दे असा त्यांचा दबाव होता. 5 / 9गुन्हा दाखल केला नाही तर आम्ही सक्षमला मारून टाकू किंवा स्वतः जीव देऊ अशा धमक्या देत होते. शस्त्रांचा धाक दाखवत होते, त्यामुळे वर्षभरापूर्वी अल्पवयीन असताना सक्षम विरोधात विनयभंगाची तक्रार दिली होती, असेही आंचलने सांगितले. 6 / 9माझे वय १८ वर्षे पूर्ण होताच मी स्वतः न्यायालयात जाऊन सक्षमच्या बाजूने साक्ष दिली. याच गुन्ह्यात सक्षमवर एमपीडीएची कारवाई झाली. तो गुन्हेगार नव्हता, असेही आंचल म्हणाली. पोलीस माझ्या वडिलांकडून पैसे घेऊन जात होते. माझ्या वडील आणि भावांनी दोन नंबरचे धंदे करून पैसे कमावले. तीन वर्षात मला खूप दबाव टाकला, खूप वेळा मारहाण केली, असा आरोपही आंचलने केला.7 / 9'सक्षमला मी सगळे काही सांगितले, मी त्याला पळून जाऊ म्हणाले. पण तो बोलला तुझ्या वडिलांची खूप इज्जत करतो. त्यांना मनवून तुला न्यायचे असे सक्षम म्हणायचा. माझ्या प्रेमाचे माहीत नाही, पण सक्षम माझ्यावर खूप प्रेम करायचा, असेही आंचलने सांगितले.8 / 9२७ तारखेला मला माझा भाऊ पोलिस ठाण्यात चल म्हणाला सक्षमवर गुन्हा दाखल करायचा आहे. त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यासाठी माझ्यावर बळजबरी करत होता,पण मी तक्रार दिली नाही. सर्व पोलिसांसमोर सांगितलं मला सक्षम वर गुन्हा दाखल करायचा नाही. तेव्हा पोलीस कर्मचाऱ्याने माझ्या लहान भावाला म्हणाले. रोज मारामाऱ्या करून इथे येतोस. तुझ्या बहिणीचं लफडं ज्याच्या सोबत आहे. त्याला मारून ये, असं बोलून त्या कर्मचाऱ्याने माझ्या भावाला भडकवले, अशी धक्कादायक माहिती आंचलने दिली. 9 / 9माझा भाऊ बोलला त्याला मारूनच इथे येतो. त्या दिवशी संध्याकाळी मला सांगितले देव दर्शनाला जायचे. मला घेऊन परभणी जिल्ह्यातील मानवत येथे आईच्या माहेरी नेले. त्यावेळी वडील आणि दोन भाऊ सोबत नव्हते. आई आणि काका काकू होते. आम्ही मानवतला थांबलो तिथे पोलीस आले आणि तिथे दोन्ही भाऊ आणि वडील पण होते.