राज ठाकरेंच्या सभांचा झंझावात सुरु; सभेपूर्वी दिली गुरुद्वाराला भेट By ऑनलाइन लोकमत | Published: April 12, 2019 4:18 PM
1 / 10 मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या सभांचा झंझावात आजपासून सुरु होणार आहे. 2 / 10 नांदेडमधील नवी मोढा येथे त्यांची पहिली जाहीर सभा होणार आहे. या सभेआधी गुरुद्वाराचे दर्शन घेतले. 3 / 10 लोकसभा निवडणूक दौऱ्यातील राज ठाकरेंची ही पहिलीच सभा असून आणखी 19 तारखेपर्यंत आणखी 5 म्हणजेच एकूण सहा सभांचे नियोजन करण्यात आले आहे. 4 / 10 नांदेड येथील सभा झाल्यानंतर १५ एप्रिल रोजी राज ठाकरे यांची सोलापूर येथे सभा होणार आहे. 5 / 10 यानंतर १६ एप्रिल रोजी कोल्हापूर, १७ एप्रिल रोजी सातारा, १८ एप्रिल रोजी पुणे तर १९ एप्रिल रोजी महाड येथे ते जाहीर सभा घेणार आहेत. 6 / 10 मनसेने लोकसभा निवडणुकीसाठी आपले उमेदवार रिंगणात उतरविलेले नाहीत. 7 / 10 मात्र, देश आणीबाणीच्या उंबरठ्यावर उभा असल्याचे सांगत याबाबत जनजागृती करण्यासाठी राज ठाकरे सभा घेणार आहेत. 8 / 10 तसेच, पुन्हा पंतप्रधानपदी नरेंद्र मोदी नको हे सांगण्यासाठीच लोकसभा निवडणूक प्रचाराच्या रणधुमाळीत या सभा घेत असल्याचे राज ठाकरे यांनी स्पष्ट केले आहे. 9 / 10 दरम्यान, लोकसभेच्या दुसऱ्या टप्प्यात मराठवाड्यातील औरंगाबाद वगळता इतर सर्व जागांसाठी मतदान होणार आहे. 10 / 10 नांदेडचाही यामध्ये समावेश आहे. त्यापूर्वी राज ठाकरे सभा घेऊन राजकीय वातावरण ढवळून काढणार आहेत. (सर्व फोटो - सचिन मोहिते) आणखी वाचा